Dr APJ Abdul Kalam Untold History

| ऋजु स्वभावाचे संशोधक राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जुलै २००२. भारताच्या राष्ट्रपतीनिवडीविषयीची शोधमोहीम उच्च पातळीवर सुरू होती. दिवसेंदिवस कुतूहल वाढत होते. अनेक नावे चर्चेत येत होती. या शोध मोहिमेची सांगता एका महान संशोधकाच्या नावापाशी झाली. आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती झाले. ही घटना सान्या भारतीयांना दिलासा देणारी तर ठरलीच, पण ज्ञान-विज्ञान संस्कृतीचाही गौरव करणारी ठरली. राजकारणापासून दूर असणाऱ्या एका सालस व सात्त्विक व्यक्तीस हे पद देऊन भारतीय सत्तेने आपत्ता सम्मान करून घेतला. समाजजीवन चारी बाजूंनी काळवंडलेले असताना डॉ. कलाम यांच्या रूपाने एक प्रकाशरेषा राष्ट्रपटलावर उमटली. दुःख आणि निराशेच्या क्षणी ज्यांचा सहवास हेच मोठे सांत्वन ठरेल, असे राष्ट्रपती आपल्याला लाभलेले आहेत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यावर ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच डॉ. कलाम यांच्या बाबतीत उमटलेल्या दिसतात. एका अग्रगण्य क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाला एका विशाल देशाचे नायकत्व मिळाल्यामुळे राजकारणाला नवे मूल्य प्राप्त झाले. तामिळनाडूतील रामेश्वरम हे डॉ. अब्दुल कलाम यांचे गाव. जैनुलबदीन आशियम्मा दांपत्याच्या पोटी ते जन्माला आले. एक आदर्श जोडपे म्हणून परिसरात त्यांचा नावलौकिक होता. डॉ. कलाम यांचे वडील नावाडी होते. त्यांना शिक्षणाचा गंध नव्हता, पण उपजत शहाणपणाचा सुगंध लाभला होता. आपल्या मुलाने 'कलेक्टर' व्हावे, ही त्यांची आंतरिक इच्छा होती. परिस्थिती बेताची, पण मनाची श्रीमंती दांडगी होती. डॉ. कलामांच्या प्रत्येक यशामागे जिद्द दिसते. लहानपणी कष्टाची कामे करून त्यांनी शाळेची फी भागविली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चिंचोके गोळा करून ते एका दुकानात देत असत. त्या बदल्यात एक आणा त्यांना मिळत असे. चालत्या रेल्वेगाडीतून फेकलेले वर्तमानपत्रांचे गठ्ठे गोळा करण्याचे काम त्यांनी केले आहे. कष्टाच्या कमाईत धन्यता असते हे खरे, पण ज्या वयात त्यांना हे कष्ट उपसावे लागले, ते पाहिले म्हणजे डॉ. कलामांच्या खडतर बालपणाची कल्पना येते. शाळेमध्ये कुशाम असणाऱ्या अब्दुलांना याच वयात वर्णश्रेष्ठत्वाचे चटके सोसावे लागले. अब्दुलांचे वडील प्रेमळ होते, पण वेड्या प्रेमापायी त्यांनी मुलांच्या कर्तृत्वाला घराचे कुंपण घातले नाही. 'सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छाआकांक्षा जिथे पूर्ण होतील, तिथे तुला जायला हवे ही जाणीव वडिलांनी करून दिली. रामनाथपुरममधल्या 'वाई' हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून अब्दुल कलाम १९५० मध्ये त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे बी. एस्सी. झाले. नंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. तिथे निवड झाली खरी, पण निवडीचा आनंद व्यक्त करावा अशी परिस्थिती नव्हती. महागडे शिक्षण पदरात पाडून घेण्यासाठी कोणापुढे हात पसरावा समजत नव्हते. अशा वेळी त्यांची बहीण पुढे आली. लाडक्या भावासाठी आपल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील साखळी बँकेत गहाण ठेवून तिने फीची सोय केली. याच क्षणी अब्दुलांनी शपथ पतेली, स्वकमाईतून दागिने सोडविण्याची निः अथक अभ्यास करून शिष्यवृत्ती मिळवण्याची आपले सोन्याचे दागिने देताना डॉ. कलामांच्या बहिणीला त्यावेळी हे वाटले असेल की आपला भाऊ एक दिवस भारतमातेच्या गळ्यातला दागिना व्हावा। बहिणीच्या डोळ्यांतले स्वप्न त्यांनी जिद्दीने साकार केले. चिकाटी हो तर संशोधकाची खरी कसोटी असते. याच शिक्षण काळात भेटलेल्या प्रो. स्पॉडर यांची एक भावस्पर्शी आठवण डॉ. कलाम यांनी 'अग्निपंख ग्रंथात सांगितली आहे. प्रो. स्पॉडर हे धीरगंभीर, उत्साही, प्रगल्भ व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांच्या निरोपसमारंभाचा कार्यक्रम होता. फोटोसाठी प्राध्यापकवर्ग खुच्यचर, तर त्यामागे उंचाप्रमाणे विद्यार्थी उभे होते. अब्दुल कलाम शेवटच्या ओळीत उभे होते. फोटोग्राफर सज्ज होता. इतक्यात प्रो. स्पॉडर उभे राहिले. त्यांनी अब्दुलांना खाली येऊन आपल्याशेजारी बसायला सांगितले. फोटो काढला गेला. सारे चकित झाले. गुरुवर्य अभिमानाने म्हणाले, "तू माझा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आहेस. भविष्यात तुझ्या कार्यक्षमतेने व सतत उद्योगात राहण्याच्या वृत्तीमुळे तू तुझ्या गुरुजनांचे नाव करणार आहेस." [गुरुचा आशीर्वाद फलद्रुप झाला. डॉ. कलामांनी गुरुजनांबरोबर राष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. अवकाशशास्त्र तंत्रज्ञानाचा पाया घालणारे ते स्फूर्तिस्रोत झाले. जादवपूर विद्यापीठाने डॉ. नेल्सन मंडेलांसमवेत डॉ. कलामांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी प्रदान केली. आय.आय.टी. मुंबईनेही असाच गौरव केला. 'पद्मभूषण', 'भारतरत्न' किताब त्यांच्या दिशेने धावत आले. त्यापूर्वी म्हणजे १९९० मध्ये प्रजासत्ताकदिनी त्यांना 'पद्मविभूषण' देण्याची घोषणा झाली, तेव्हा सध्याचे हे राष्ट्रपती त्रिवेंद्रमच्या दहा बाय बाराच्या खोलीत पुस्तकांच्या गराड्यात हरविले होते. डामडौल त्यांच्या रक्तात नाही. तरुणांना लाजवेल असा उत्साह व खळखळते हास्य त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षीही जपले आहे. वागण्या बोलण्यात ऋजुता आहे. त्यांच्या शाकाहारी असलेल्याची मोठी जाहिरात झाली. कॉलेज विद्यार्थी असताना मी शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला. त्यामागे पैशाचा अभाव हे एक कारण होते, अशी प्रांजळ कबुली त्यांनी 'अग्निपंख' मध्ये दिली आहे. डॉ. कलाम यांच्या संघर्षशील जीवनाचा सहजसुंदर आविष्कार म्हणजे 'अग्निपंख' ग्रंथ आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचविणाऱ्या या महान संशोधकाची ही आत्मकहाणी वेद-कुराणांचा संदर्भ देते, गुरुभक्ती, देशभक्ती आणि नीतिकर्माची महती सांगते. या प्रथात आधुनिक तंत्रज्ञान, अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग क्षेपणास्त्रांची जडणघडण सांगितली आहेच, याशिवाय माणसांच्या जडणघडणीसाठी मार्मिक व मौलिक जीवनभाष्ये नोंदविली आहेत. 'प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकाशाची ज्योत तेवत असते. दुःख, अपयश, निराशेच्या अंधारात ती वाट दाखवू शकते. तुम्हाला योग्य जागी पोचण्यासाठी मार्गदर्शन करते. एकदा का त्या देवत्वाशी, ज्योतोशी तुमचे अनुबंध जुळले, तर तुम्ही मुक्तीच्या आनंदाच्या, मनःशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होता.' असा उदात्त संदेश डॉ. कलाम यांच्या आत्मकहाणीने दिला आहे. - विज्ञानाच्या सखोल अभ्यासातून बुद्धीचा विकास होतो. आध्यात्मिक उंची वाढते आणि स्वतःची नव्याने ओळख पटवून घेता येते, हे डॉ. कलाम यांचे आत्मपरीक्षण आहे.. एरोनॉटिकल अभियंता झाल्यावर डॉ. कलामांना वैमानिक व्हायचे होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. हवाईदल निवड समितीने त्यांना निवडले नाही. एका निराश अवस्थेत ते हृषीकेशला आले. तेथील स्वामी शिवानंदांनी त्यांच्या चित्तातील चैतन्य जागविले. प्रत्येक माणसाच्या मनात एक अग्निकण असतो. परिस्थितीन त्यावर राख साठते. एखाद्या विचाराच्या लहरीने राख दूर होते. अग्निकण चेतवला जातो आणि मग प्रगतीचे पंख घेऊन माणूस कीर्तीच्या अवकाशात झपावतो. स्वामीजींनी सांगितले, "हृदयापासून, आत्म्यापासून एखादी इच्छा निर्माण झाली असेल, तिचा मनाला ध्यास लागला असेल तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत् चुंबकीय ऊर्जा असते. आपण जेव्हा झोपतो, तेव्हा तो इच्छा आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन तो इच्छा सकाळी पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये परतते. रोज सकाळी सूर्य उगवतो. ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो, हे जितके अटळ आहे, तसे अशी इच्छा पूर्ण होगे अटळ आहे." स्वामीजींच्या उपदेशाने डॉ. कलाम भारावून गेले. वाट चुकलेल्या माझ्यासारख्या शिष्याला त्या क्षणी गुरूची गरज होती. आणि खरेच शुरू भेटला, असे त्यांना वाटले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून ते संरक्षण खात्यात दाखल झाले. पं. नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे भारतामध्ये अवकाश-संशोधनाला संजीवनी मिळाली. पंडितजींचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना प्रोफेसर विक्रम साराभाई यांची कणखर साथ लाभली. डॉ. कलाम यांनी प्रो. साराभाईना 'भारतीय विज्ञान क्षेत्रातील महात्मा गांधी म्हटले आहे. प्रो. साराभाईप्रमाणेच प्रो. सतीश पवन, डॉ. ब्रह्मप्रकाश, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. अरुणाचलम अशा अनेक निष्णात शास्त्रज्ञांसमवेत डॉ. कलाम यांनी अवकाशयाने, क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. आपल्या उज्ज्वल प्रज्ञा प्रतिभेतून स्वयंपूर्ण व समर्थ राष्ट्राचे स्वप्न पाहणारे डॉ. कलाम हे समर्पित वृत्तीचे संशोधक आहेत. युवकांची मने प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ऋषिमय व्यक्तिमत्त्वात आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माणसाला किती उंच जाता येते, हेच त्यांनी सिद्ध केले आहे. डॉ. कलाम यांची भरारी अभिमान वाटावा, अशीच आहे. १५ ऑक्टोबर १९९१ या दिवशी निवृत्त झाल्यावर उपेक्षित व गुणी मुलांसाठी शाळा काढावी, त्यांचा संकल्प होता, पण भारत सरकारने त्यांची निवृत्तीच नाकारली. व्यक्तीच्या, राष्ट्राच्या आयुष्यात सत्त्वपरीक्षा पाहावी, असे अनेक प्रसंग येतात. जेव्हा असे प्रसंग येतील, तेव्हा या ऋजू स्वभावाच्या संशोधक राष्ट्रपतींचा जीवनग्रंच त्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देईल. त्यातून विश्वाचे जीवन चैतन्यमय होईल. रवींद्रनाथांनी पाहिलेल्या निर्भय, ज्ञानमय व सुंदर भारताचे स्वप्न साकारण्यासाठी आपण डॉ. कलाम यांना मनोभावे साथ दऊया.
Previous Post Next Post