राम गणेश गडकरी
माणसाने भाषा घडविली. भाषेने साहित्य घडविले आणि साहित्यावर माणूस घडविण्याची जबाबदारी आली. भाषा हे मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. या भाषेचा कौशल्याने आणि कल्पकतेने वापर करणारे, अलौकिक प्रतिभेचे भाषाप्रभू म्हणून राम गणेश गडकरी यांचा गौरव केला जातो. लोलकातून जशी सप्तरंगांची उधळण व्हावी, तशी 'गडकरी' नावाच्या साहित्यहिन्याकडून काव्य, विनोद, नाट्यरंगाची मनोवेधक उधळण झाली. 'गोविंदाग्रज' या नावाने त्यांनी मराठी शारदेच्या दरबारात 'वाग्वैजयंती' नावाचे काव्यरत्न बहाल केले, तर 'बाळकराम' नावाने हास्यविनोदाची कारंजी फुलवली.
गुजरातमधील नवसारी हे गडकऱ्यांचे जन्मगाव, तसे त्यांचे मूळ गाव कर्जत तालुक्यातील सांगवी, पण वडील बडोदा संस्थानात मुलकी खात्यात नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या नवव्या वर्षापर्यंत गडकऱ्यांचे शिक्षण गुजरातीतून झाले. वडिलांच्या व धाकटा भाऊ गोविंदच्या निधनानंतर गडकऱ्यांच्या मातोश्रींनी विनायक, राम व शंकर या लेकरांना घेऊन कर्जत गाठले. तेथे गडकऱ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया रचला गेला. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या मातोश्रींनी पुण्याची वाट पकडली. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून गडकरी मॅट्रिक झाले. फर्ग्युसन कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकत असताना, आईच्या आग्रहामुळे ते चतुर्भुज झाले.
गडकऱ्यांचा थोरला भाऊ विनायक बी. ए. होऊन वकिलीच्या अभ्यासात गुंतला होता. तर राम गणेश ‘फर्ग्युसन कॉलेज'ला रामराम ठोकून, किर्लोस्कर नाटक कंपनीत कलावंतांचे 'मास्तर' म्हणून रूजू झाले होते. नाट्यवेडापायी त्यांनी स्वखुशीने 'द्वारपाला'चे काम स्वीकारले होते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या साहित्यसंस्कारामुळे उल्हसित झालेल्या त्यांच्या प्रतिभेला प्रेरक प्रांगण भेटले. जेवून खाऊन बारा रुपये पगारावर काम करणारे गडकरी पुढे रंगभूमीचा गड काबीज करणार आहेत, याची कोणाला कल्पना नव्हती. '' 'नाटक कसे पाहावे' इ. विषयांवर त्यांनी 'रंगभूमी' मासिकातून लेख प्रसिद्ध केले. त्यासाठी 'सवाई नाटको' नाव धारण केले. तर 'बाळकराम' नावाने 'लग्न मोडण्याची कारणे', 'कवीचा कारखाना निनोदी लेख 'मनोरंजन' मासिकातून लिहून धमाल उडवून दिली. त्यांच्या 'गर्वनर्वाण', '' • नाटकांना रंगभूमीचे भाग्य लाभले नाही. 'काळ', 'करमणूक'मधून त्यांच्या काव्यसरितेला ओघ प्राप्त झाला.
read also
नाना शंकरशेट | Nana Shankar sheth | Untold history of nana shankar sheth |
किलोस्कर नाटक कंपनीशी मतभेद झाल्यावर त्यांनी विदर्भातल्या बाळापूर गावी शाळा मास्तरकी पत्करली. नंतर ते 'ज्ञानप्रकाश'चे उपसंपादक झाले. वृत्त अलंकारात रमणारे गडकरी वृत्तपत्रसृष्टीत रमले नाहीत. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मास्तर झाले. तेथेही असिस्टेट सुपरिटेंडेटशी त्यांचे बनले वर्गात शिकवत असताना परवानगी न घेता आलेल्या सुपरिटेडेटना त्यांनी सुनावले, "खाली मी आणि डोक्यावर ईश्वर याखेरीज तिची सत्ता भी मानत नाही." असे म्हणत गडकरी से वर्गाबाहेर पडले ते शाळेकडे पुन्हा फिरकलेच नाहीत. नाट्यपदे रचण्याच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा किलोस्कर नाटक कंपनीशी धागा जुळला.
'प्रेमसंन्यास' हे गडकल्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक. या नाटकाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली. त्यांच्याकडे नाटकासाठी मागणी वाढली. गडकऱ्यांकडे बुद्धीचे चातुर्य आणि शब्दांचे सामर्थ्य होते, पण ते भलतेच हट्टी नि लहरी होते. त्यांच्याकडून वेळेवर नाटक मिळणे ही गोष्ट दुरापास्त होती. किर्लोस्कर नाटक कंपनीला त्यांनी 'पुण्यप्रभाव' नाटक देण्याचे मान्य केले. त्यानुसार नाटकाची जाहिरात करण्यात आली. गडकऱ्यांकडून उपलब्ध झालेल्या अपूर्ण नाट्यसंहितेवर तालमी सुरू झाल्या. शेवटी नाटकाचा प्रयोग आठ-दहा दिवसांवर आला तरी नाटकाचा शेवटचा प्रवेश पूर्ण झाला नव्हता. अशातच गडकऱ्यांनी 'किर्लोस्कर नाटक कंपनी'ला 'पुण्यप्रभाव' नाटक करता येणार नसल्याचे सांगितले. नटांचे व नाटक कंपनीचे धाबे दणाणले. यावर उपाय म्हणून शंकरराव मुजुमदारांनी प्रसिद्ध लेखक वि. सी. गुर्जरांना गाठले. 'काय वाटेल से करून मास्तरांकडून नाट्यप्रवेश पूर्ण करून घ्या' अशी गळ घातली. गडकल्यांना लिहिते करण्याची अवघड जबाबदारी गुर्जरांनी घेतली.
त्यांनी गडकऱ्यांना एका प्रसन्न मूडमध्ये गाठले, "मास्तर, माझ्यासाठी तरी तुम्ही प्रवेश पुरा करून द्या. तुम्ही सांगा मी लिहून घेतो." असे सांगितले. गुर्जरांचे साहित्यातील श्रेष्ठस्थान लक्षात घेता, त्यांनी आपले नाटक 'डिक्टेक्ट' करावे, ही बाब गडकल्यांना सहन होईना. गुर्जरांनी नाना परीने त्यांची समजूत काढली, हट्ट धरला. ते कागद-पेन्सिल घेऊन ठाण मांडून बसले. शेवटी खोलीत येरझाऱ्या घालीत 'पुण्यप्रभाव'चा शेवटचा प्रवेश वीस-पंचवीस मिनिटांत पूर्ण झाला. या वीस-पंचवीस मिनिटांसाठी गडकल्यांनी नाट्यचालकांचे प्राण कासावीस करून ठेवले होते. गडकऱ्यांच्या अचाट व अलौकिक प्रतिभेमुळे नाट्यकंपन्या त्यांच्या कमालीच्या लहरीपणाकडे दुर्लक्ष करायच्या.
एखाद्या लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीतून अशी एखादी कलाकृती जन्माला येते, जी त्याला मृत्यूनंतर जिवंत ठेवते. हे भाग्य गडकन्यांच्या 'एकच प्याला' नाट्यकृतीला लाभले. या नाटकाचा नायक 'सुधाकर, सिधू की दारू?' अशीही चर्चा गाजली; पण मराठी शोकान्त नाटकाला शेक्सपिअरच्या जोडीला नेण्याची उत्तुंग कामगिरी 'एकच प्याला'ने केली. गडकऱ्यांच्या भाषिक, शाब्दिक, कसरतीवर टीका झाली असली, तरी भारतीय स्त्रीजीवनातील कारुण्य गडकल्यांनीच संवेदनशील भाषेद्वारे प्रेक्षकांच्या काळजाला भिडविले, हे नाकारता येणार नाही.
'एकच प्याला'ची जन्मकथा कोणी सांगते गडकऱ्यांच्याच जीवनाशी निगडित आहे. तर कोणी इंदुरच्या एका वकिलांनी दारूच्या नशेत आपल्या गरोदर पत्नीला ओटीपोटावर लाथ मारल्याची बातमी' या नाटकाच्या जन्माला कारणीभूत असल्याचे सांगते. या संदर्भात बालगंधर्वाची एक भेटही महत्त्वाची मानली जाते. या भेटीत बालगंधर्वानी गडकऱ्यांकडे एका नाटकाची मागणी केली. खरे तर बालगंधर्वानी किर्लोस्कर नाटक कंपनी सोडल्यामुळे गडकरी त्यांच्यावर नाराज होते. त्यात बालगंधर्वाच्या उंची वस्त्रांचा व अत्तराचा शौक त्यांना माहीत होता. त्यामुळे एक विचित्र अट गडकऱ्यांनी त्यांना टाकली. "नारायणराव, माझ्या नाटकात तुम्हाला फाटकं लुगडं नेसून दळावं लागेल, आहे कबूल?" फाटक्या लुगड्याला बालगंधर्व नकार देतील, हा गडकऱ्यांचा अंदाज होता, पण बालगंधर्वाच्या मुखातून जातिवंत नटाला साजेसे उद्गार बाहेर पडले, "फाटक लुगढं काय, पण गोणपाट नेसूनसुद्धा मी काम करायला तयार आहे; पण आम्हाला नाटक तुमचे हवं."
पुढे बालगंधर्वांनी पुन्या सामर्थ्यानिशी. 'एकच प्याला'तील पतिव्रता सिंधू उभी करून, फाटक्या लुगड्याला महावस्त्राची उंची दिली, पण हे दुर्दैव की गडकन्यांना ही सिंधू पाहण्यापूर्वीच वसुंधरेचा निरोप द्यावा लागला होता. गडक-यांचा नाट्यसंसार मोठा नव्हता, पण त्यांच्या नाटकांनी १९१५ ते ३० च्या कालखंडात रंगभूमी गाजवली. अलंकार, कोट्या, कल्पनाविलास यांचा मुक्तपणे वापर केला. प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली. मराठी माणसाला भुरळ पाडणारी विचारमौक्तिके उधळली. त्यांच्या 'प्रेमसंन्यास'मधील गोकुळ, 'पुण्यप्रभाव'मधील कालिदी, 'राजसंन्यास'मधील तुळशी, 'एकच प्याला'तील सिंधू आणि 'भावबंधन'मधील धुंडिराज कामण्णा यासारख्या व्यक्तिरेखांना, गडकऱ्यांच्या अलौकिक प्रतिभास्पर्शामुळे चिरंजिवीत्व प्राप्त झाले आहे.
read also
वि. वा. शिरवाडकर|Vi.Va.Shirvadkar untold history
कवी म्हणूनही गोविंदाग्रजांच्या प्रतिभेची झेप पल्लेदार होती. त्यांचे अप्रकाशित साहित्य आचार्य अत्र्यांनी संपादित केले. तर कुसुमाग्रजीनी 'पिपळपान' या नावाने गडकऱ्यांचा काव्यसंग्रह संपादित केला. उत्तुंग कल्पनाशक्ती व उचाट शब्दचमत्कृती लाभलेले गडकरी 'सरस्वतीचा कंठमणी होते. व्यक्तिगत जीवनातील दुःख, दारिद्र्याची पर्वा न करता त्यांनी मराठी भाषेला श्रीमंत केले.
चमत्कृतिजनक विनोद निर्माण करण्यात गडकरी निष्णात होते. अगदी स्वतः तापाने फणफणत असताना डॉक्टरांनी त्यांना औषध दिले, पण काही केल्या गुण येईना. घाम येईना. ताप कमी होईना. शेवटी डॉक्टरांना घाम आला. ते अस्वस्थ झाले. यावर गडकऱ्यांनीच 'घाम' येण्याचा उपाय सुचविला. "डॉक्टरसाहेब, असे करा, तुमचे बोल पाठवून द्या. ते पाहिल्यावर मलाच काय, पण घरातल्या साऱ्यांना घाम येईल." मिस्किलपणा जपण्यासाठी आवश्यक असणारी खट्याळ विनोदबुद्धी गडकऱ्यांकडे जन्मतःच होती. त्यांना अवघे ३४ वर्षांचे आयुष्य लाभले. २६ मे १८८५ ते २३ जानेवारी १९१९ पर्यंत ते विश्वाच्या रंगभूमीवर वावरले, 'जन्म नवसारीचा आणि मृत्यू विदर्भातील सावनेरीचा' असा अनोखा अनुप्रास नियतीने साधला होता. त्यांनी 'भावबंधन' नाटकाचे लिखाण हातावेगळे केले आणि मराठी साहित्याला अक्षरांची अक्षय देणगी देणारे हे प्रतिभेचे पिंपळपान संसारवृक्षावरून गळून पडले.