अश्रूंचा अर्थ
भगवान बुद्ध एका झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. थोड्या अंतरावर मुलांच गोगाट चालू होता. बुद्ध मात्र शांत होते. मुलांचा आंब्याच्या झाडावर दगई मारण्याचा कार्यक्रम रंगात आला होता. पहलेले आंबे वेचण्यासाठी लगबग चालू होती. आणि अचानक... एका मुलाचा दगड दोन फांद्यांमधून भिरभिरत बुद्धांच्या कपाळावर जाऊन आदळला. मुलांच्या काळजात चर्रऽऽ झाले. ती एकदम चिडीचूप झाली. वाऱ्याचे घोंगावणे फक्त ऐकू येऊ लागले. बुद्धांनी शांतपणे डोळे उघडून सभोवार पाहिले. लांबवर दोन मुले शरमिदी होऊन, मान खाली घालून उभी होती. भेदरली होती ती! बुद्धांनी अत्यंत वात्सल्याने त्यांच्याकडे पाहिले. खरंतर ती पळून जाण्याच्याच बेतात होती, पण बुद्धांच्या शांत, करूण नजरेने त्यांना दिलासा दिला. मग ती मंदपणे चालत बुद्धांपाशी आली.
-------------------------------------------------------------------
also read
शिवनेरी किल्ल्याचा शिवजन्मापूर्वीचा इतिहास | शिवनेरी किल्ला कोणत्या राजाने व का बांधला? | जाणून घ्या | Information About Shivneri Fort | The history of shivneri fort in details
-------------------------------------------------------------------
बुद्धांच्या कपाळाला भलीमोठी खोक पडली होती. सारं कपाळ काळंनि झालं होतं. जखमेतले रक्त डोळ्याच्या कडेने हळूहळू ओघळत सरकत होते. मुलं पुन्हा एकदा गलबलली. त्यांनी हात जोडले. गुडघ्यावर उभी राहिली. बुद्धांच्या चरणावर मस्तक ठेवून क्षमा मागू लागली. कपाळावर जखम असूनही बुद्धांचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा फुलला होता. त्यांच्या मुखमंडलावर संस्कृतीचे सात्विक तेज विलसत होते. मस्तक झुकवलेल्या मुलांच्या केसांतून त्यांनी दार हात फिरवला. नजरेत वात्सल्य होतं आणि स्पर्शात ममता होती. त्यांनी शांतपणे मुलांना विचारले.
"बाळांनो, क्षमा कसली? आपली चूक तरी काय!" आता मुलं पुरती गांगरून गेली. आजवर छोट्या चकीला मोठी शिक्षा भोगावी
मुलांना हा अनुभव नवीन होता. चैतन्याचा होता. त्यातला एक मुल पुढे होऊन भाबडेपणाने व थोड्या धिटाईने आपल्या चुकीचं समर्थन करू लागला तर... आम्ही दगड आंब्याच्या झाडाला मारत होतो. आम्हाला दोनआंबे मिळाले.".
"हां... दोन आंबे मिळाले. दुसऱ्या मुलाने उत्स्फूर्तपणे दुजोरा दिला, "पण त्यानंतर पुष्कळ दगड मारूनसुद्धा आम्हाला आंबा मिळेना. त्यातला एक दगड चुकून... हो चुकून आपल्याला लागला. आपल्याला दगड मारण्याचा बिलकूल हेतू नव्हता. हां... आम्हाला आंबे हवे होते." बोलता बोलता मुलाचे डोळे पाण्याने डबडबले, बुद्धांनी त्यांना पुन्हा एकवार वात्सल्याने न्याहाळले. करुणा जागी झाली. उत्कट प्रेमाने मन उचंबळून आले. नेत्रांतून अश्रुधारा ओघळू लागल्या. मुले भांबावून गेली. बुचकळ्यात पडली. इतक्या वेळ शांत चित्ताने संवाद साधणाऱ्या भगवान बुद्धांच्या डोळ्यांतून अश्रू त्यांना अश्रूंचा अर्थच कळेना आणि मग जाणीव झाली, हे अश्रू निश्चितच या जखमेच्या वेदनेचे असणार... रक्त ओघळत होते. त्याकडे पाहून त्यातला एक म्हटला,
---------------------------------------------------------------------------
also read
-------------------------------------------------------------------
"भगवान, आम्हाला खरंच माफ करा." बुद्ध शांतपणे हसले. "माफी कसली, बाळांनो?"
"आपल्या जखमेच्या वेदना आम्हाला समजतात. इतक्या वेळ रक्त वाह आहे आणि आता आपल्या डोळ्यांतून अश्रू येताहेत।"
"बाळांनो, हे अश्रू या जखमेच्या वेदनेचे नाहीत." "मग आपल्या डोळ्यांतून अश्रू का येत आहेत?"
"माझ्या डोळ्यांतील अश्रूंचा अर्थ जाणून घ्यायचाय.." मुलांनी मान हलवली. मंद स्मित करीत भगवान बुद्धांनी महापुरुषांच्या डोळ्यांतील अश्रूंचा अर्थ सांगितला. "अरे, त्या आंब्याच्या झाडावर दगड मारल्यावर त्या झाडाने आपल्याला निदान दोन आंबे तरी दिले, पण मला दगड लागल्यानंतर मी मात्र तुम्हाला आता काहीच देऊ शकत नाही. याचे हे अप्रू आहेत."
. ज्या बुद्धांनी मानवी जातीच्या कल्याणासाठी प्रज्ञा, करुणा, शील, सत्य, अहिंसा, अमानित्व यांची शिकवण जगाला दिली आणि तुमचं आमचं जगणं श्रीमंत केलं, त्या बुद्धांनी 'मी आता काहीच देऊ शकत नाही' असं म्हणणं... हेच महापुरुषांचे मोठेपण असते. त्यांच्या अश्रृंतदेखील चैतन्याचे चांदणे असते. माणसाविषयीचीच स्नेहधारा त्यांच्या अश्रूंतून पाझरत असते.
भगवान गौतम बुद्ध
संग्रह-नवल्या आर्टस्