सोनेरी भेट
महात्मा गांधी
हा प्रसंग अलाहाबादचा आहे. महापुरुषांच्या सहवासातील क्षण ही सामान्य माणसांच्या आयुष्यातील एक सोनेरी भेट असते. तो त्यांच्या दृष्टीने अनमोल ठेवा असतो. असाच एक ठेवा एका गरीब माणसाला महात्मा गांधीकडून लाभला.
शांतीचा पावा घेऊन समतेचा सूर आळविणारे गांधीजी हे संत कोटीतील व्यक्तिमत्त्व. ते कमला नेहरू स्मारक दवाखान्याच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अलाहाबादला आले होते. त्यांचा मुक्काम पंडित नेहरूंच्या आनंदभवनामध्ये होता. त्यांना एक न्हावीदादा हवा होता.
नेहरूंचे खाजगी चिटणीस श्री. उपाध्याय यांनी पुत्रीलाल नावाच्या एका कुशल न्हावीदादाला पाचारण केले. त्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट केली, पुत्रीलालचा मूळ पोशाख उतरवला व त्याला तात्पुरते स्वच्छ खादीचे कपडे घालायला दिले. त्यांना गांधींचे खादीप्रेम माहिती होते. खादी म्हणजे स्वदेश प्रेमाचे, प्रामाणिकपणाचे, त्यागाचे सत्यनिष्ठेचे प्रतीक.
---------------------------------------------------------------------------------
also read
---------------------------------------------------------------------------------
खादीचा एक प्रसंग असाही आहे. कोण्या एका माउलीने गांधीजीच्या सत्याग्रहाला आर्थिक मदत म्हणून आपल्या अंगावरचे सोन्याचे दागिने समोरच्या कार्यकर्त्याच्या ओजळीत दिले, तो कार्यकर्ता चकित झाला. भारावून गेला. त्याने विचारले.
"ताई, आपली गांधीजींच्यावर अपार निष्ठा आहे, कबूल... पण हे सारे दागिने मी बापूंना देईन, यावर आपला विश्वास तरी कसा बसला?"
क्षणाचाही विलंब न करता तो माऊली म्हणाली, “विश्वास! अरे, माझा विश्वास तू घातलेल्या गांधीबाबांच्या खादीवर आहे."
आजच्या महागाईच्या काळात एखादी माऊली 'खादी'कडे बघून कदाचित सोन्याचे दागिने देणार नाही, पण ती जे सोन्यासारखे मत देते त्याची गांधीबाबांचे नाव घेणाऱ्यांनी माती करू नये, एवढाच विचार करावा. तर गांधीजीना त्रिय असणान्या खादीच्या पोशाखात पुत्रीलाल तयार झाला
खादीचे कपडे त्याला नीट येत नव्हते. तरी एका महात्याचा सहवास व त्यांची सेवा करण्याची अपूर्व संधी लाभणार असल्याने तो हरखून गेला होता. आपला सैल पोशाख सावरत पुत्रीलाल आनंदभवनाच्या दुसल्या मजल्यावर हजर झाला. गांधीजी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. त्याच्याकडे नजर टाकत ते
म्हणाले, "अरे, तुम आ गये, तुम अच्छा वाल बनाते हो ना!"
पुत्रीलाल काय बोलणार? हळुवार हसत हसत त्याने नम्रपणे मान डोलावली आणि कामाला सुरुवात केली.
गांधीजीची डोई करताना एक फोटो घेण्यात आला. त्याने गांधीजींची झकास दाढीही केली. गांधीजी खूश झाले. त्या गरीब माणसाची त्यांनी ख्यालीखुशाली विचारली. घरची आस्थेने विचारपूस केली आणि शेवटी त्याच्या खादीच्या पोशाखाकडे पाहून विचारले,
"तू नेहमी खादी वापरतोस वाटतं!"
पुत्रीलाल संकोचला. त्याने नम्रपणे सांगितले, "नाही हे कपडे तात्पुरते उसने आहेत."
गांधीजींना पुत्रीलालच्या सत्यप्रिय वृत्तीचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचे व त्याच्या कामगिरीचेही कौतुक केले.
"तुम अच्छा बाल बनाते हो।"
महात्माजींच्या मुखातून निघालेल्या दोन शब्दांनी तो कारागीर बहरून गेला. त्याने प्रणाम केला व जाता जाता आपल्या कौतुकाचा धागा पकडत म्हणाला,
---------------------------------------------------------------------------------
read also
“तर मला आपण तसं सर्टिफिकेट द्या." "जोपर्यंत आपण चांगलं काम करतो तोपर्यंत प्रशस्तिपत्राची गरजच काय?"
पण पुत्रीलालला लेखी प्रशस्तिपत्र हवे होते. त्याने गळ घातली. अखेर गांधीजी तयार झाले. कागद आणण्यात आला व गांधीजींच्या हस्ताक्षरातील एक अनमोल नजराना पुत्रीलालला लाभला.
आनंदभवन, इलाहाबाद भाई पुत्रीलालने बड़े भाव से अच्छी तरह से मेरी हजामत की है। वस्तरा देहाती और बगैर साबून के हजामत करता है।
२३.११.३९- मो. क. गांधी.
प्रशस्तिपत्र छातीशी कवटाळत पुन्नीलाल निघाला. नेहरूंनी त्याला दोन रुपये कारागिरी दिली. पुढे उपाध्यायांकडून तो फोटोही घेऊन गेला..
खादीच्या पोशाखातील फोटो व गांधीजीच्या हस्ताक्षरातील प्रशस्तिपत्र हा त्याचा अनमोल ठेवा झाला. त्याला म्हणे, त्या वस्तूच्या बदल्यात कोणी शंभर रुपये देत होते, पण चिरंतन चैतन्याचा ठेवा जपण्यात त्याला जी धन्यता वाटत होती, ती त्या धनात नव्हती. पैसा काय आजचा उद्या येईल, पण महात्माजींची ती सोनेरी भेटवस्तू अशी सहज मिळणार आहे काय?
रामाचा सेतू बांधताना त्या चिमुकल्या खारोटीची सेवा ती किती? पण वेळेला धावून येणं महत्त्वाचं! तिला त्या सेवेचा मोबदला म्हणून मिळाली रामस्पर्शाची 'सोनेरी भेट.' ती भेट साऱ्या जगाला दिमाखाने दाखवत खारूताई सर्वत्र संचार करीत असतात. पुन्नीलालही खारूताईसारखाच भाग्यवान म्हणायचा!
संदर्भ-चैतन्याचे चांदणे
संग्रह-नवल्या आर्टस्