कर्मवीर भाऊराव पाटील | krmvir Bhaurao Patil Biography

 


कर्मवीर भाऊराव पाटील


आपल्या पंखाखाली रानपाखरांना घेऊन, त्यांच्यात आकाशाचे भव्यत्व आणि सूर्याचे तेजस्व पेरणारे महापुरुष म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, महापुरुषांची यरित्रमालिका म्हणजे इतिहास असतो. अशा इतिहासाचे स्मरण हे चैतन्याचे स्फुरण असते. उजाड माळरानाची रूपांतरे संपन्न ज्ञानमंदिरात करणारे कर्मवीर अण्णा हेच एक ध्यासपर्व आहे. इतिहासालाच लाभलेले ते स्फूर्तिस्थान आहे.


कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज हे कर्मवीरांचे प्रेरणास्थान होते. अज्ञानाच्या गलेत पिचत पडलेल्या समाजात अण्णा जन्माला आले. शेवटच्या श्वासापर्यंत अज्ञानाच्या अंधाराशी निर्धाराने लढत राहिले. आपल्या अलौकिक कर्तृत्वातून त्यांनी महाराष्ट्राच्या मातीवर रयत शिक्षण संस्थेच्या रूपाने ज्ञानाचे नवे तीर्थ निर्माण केले. संस्थेसाठी वटवृक्ष हे बोधचिन्ह घेऊन समाजाला सावली दिली. तरुणाईला स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र दिला. श्रमाधिष्ठित शिक्षण हे त्यांचे धोरण होते.


महात्मा फुले यांचा विधेचा मंत्र आणि सद्गुरू गाडगेबाबा यांचे स्वच्छतेचे तंत्र अवगत असलेला बुद्धिमान व बळकट विद्यार्थी आपल्या संस्थेतून निर्माण व्हावा म्हणून अण्णा अनवाणी पायाने गुणवान, गरीब पोरांचा शोध घेत, कडेकपारीत हिडले. कित्येक मुलांना त्यांनी आपल्या खांद्यावरून वसतिगृहात आणले. अण्णांची वसतिगृहयुक्त शाव्य म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळ्यच होती.


अण्णा मुळातच रत्नपारखी असल्याने त्यांना दगडगोटे आणि हिरेमाणके यांच्यातला फरक तात्काळ कळत होता. आपल्या प्रयोगशाळेत ते भेदक नजरेने व कोमल अंतःकरणाने नररत्न पडवीत होते. कवलापूरच्या गणपती पाटील मास्तरांचा मुलगा पांडुरंग असाच अण्णांच्या नरजेत भरला. आपल्या खांद्यावरून नाचवत त्याला सातारच्या वसतिगृहात दाखल केला. सुरेख अक्षर आणि तल्ख बुद्धी लाभलेला हा पांडुरंग म्हणजे बॅ.पी.जी. पाटील. उभ्या महाराष्ट्रात ते उत्तम वक्ते, प्रगल्भ लेखक आणि कुशल प्रशासक म्हणून ख्यातकीर्त झाले. पंढरीचा पांडुरंग हे वारकऱ्यांचे दैवत आहे. तर रयतेचा पांडुरंग ज्ञानदात्यांचे दैवत आहे. मंचे मांगल्य व संस्काराचे सामर्थ्य असलेली सुमधुर वाणी-लेखणी ज्यांना


लाभली आहे. ते प्राचार्य शिवाजीराव भोसले हेदेखील अण्णांच्या वसतिगृहातील विद्यार्थी एका शिवाजीने स्वराज्याचे तोरण बांधले, तर या शिवाजीरावांनी सुराज्याचे धोरण मांडले. महापुरुषांना उत्तम अनुयायी लाभले तरच ते महापुरुष समाजात प्रतिष्ठेने जिवंत राहतात अन्यथा, स्वार्थी मंडळीकडून त्यांचा पराभव अटळ असतो. प्राचार्यांनी कर्मवीरांच्या कार्याचे मोठेपण रसाळ वाणीतून मांडले.


कर्मवीरांच्या मानवतावादी कार्याची बोलकी प्रचिती देणारे बॅ. पी. जी. पाटील व प्राचार्य शिवाजीराव भोसले हे कर्तृत्वसंपन्न कुलगुरू म्हणून गौरविले जातात. हा अण्णांचा खरा सन्मान आहे. ज्ञानसंस्कृतीचा गौरव आहे.


'श्री. भाऊराव पाटील की सेवाही उनका सत्ता कोर्तिस्तंभ है हो म. गांधीची प्रतिक्रिया सार्थ ठरविणाऱ्या मालिकेतच दत्ताजीराव साळुंखे व शंकरराव खरात या कुलगुरूंची नावे अभिमानाने गुफावी लागतात.

Must Read

आणि सावित्रीबाई फुले यांची चैतन्यज्योत निमली 

या सान्याच कुलगुरूंचे अपना गुरू होते. जेव्हा त्यांना कोतींचे पंख फुटले नव्हते. तेव्हा अण्णांनी वसतिगृहाच्या या पाखरांना खडतर श्रमाची व परस्पर प्रेमाची बाराखडी गिरवायला लावली. त्यांच्यासाठी अण्णांनी स्वाध्याय, स्वाभिमान, स्वावलंबन यांची एक नवीन लिपीच तयार केली. असंख्य गोरगरीब पाखरांना ज्ञानप्रकाशाच्या प्रांगणात आणणारे कर्मवीर अण्णा है एक दीपस्तंभ होते.


शंकरराव खरात यांच्या आत्मचरित्रातील एक प्रसंग मोठा उद्बोधक आहे. शंकरराव हे पुण्याच्या युनियन बोर्डिगचे विद्यार्थी, पुणे म्युनिसिपालिटीने प्लेगच्या सावीतून बचाव करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडोच्या पायथ्याशी तयाच्या काही झोपड्या उभ्या केल्या होत्या. दारिद्र्याने गांजलेल्या अठरापगड जातीच्या मुलांना वसतिगृहासाठी अण्णांनी त्या झोपड्या मिळवल्या. आणि म. गांधी-डॉ. आंबेडकरांच्या पुणे करार नामक ऐतिहासिक दिलजमाईचे प्रतीक म्हणून वसतिगृहाचे नाव 'युनियन बोडिंग' ठेवले.


या बोर्डिगच्या एका बाजूला नंदनवनाला साजवेल असे सुंदर बागबगीचे व रेकर्यशाली प्रासाद होते. तर दुसऱ्या बाजूला स्मशानाला मागे टाकतील अशा दबा-पत्र्याच्या तटया-काथ्या, पटकरांच्या झोपडया होत्या. या दोन परस्परविरोधी संस्कृतीमध्ये बोर्डिग उभे होते. या दोन संस्कृतीमधले अंतर आपल्याला तोडावयाचे आहे' हा अण्णांचा ध्येयवाद होता. त्यासाठी ते खपत होते. चटके सोसत होते. आपल्याबरोबर मुलांनाही पुढे नेत होते.


असेच एके दिवशी अण्णा गुपचूपपणे वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात येऊन शांतपणे उभे राहिले. शंकरराव खरात भाकरी वापण्यात, भाजण्यात गुंग झाले होते. चुलीतल्या लालभडक इंगळाची धग व प्रचंड धुराचा लोट यामुळे ते घामाघूम झाले होते. एवढ्यात मागून आवाज आला, "काय रे, धूर झाला...!" अण्णांच्या आवाजाने शंकरराव दचकले. नाका डोळ्यांतले पाणी पुसत उभे


राहत म्हणाले, "सरपण ओले होते अण्णा!"

एक वात्सल्ययुक्त स्मितहास्य अण्णांच्या चेहऱ्यावर उमटले. आपल्या पोरांची धडपड पाहून, डोळ्यांत कौतुकाचे भाव दाटले. "अरे, तू बैस तुझं काम तू कर." असे बोलत त्यांनी काढता पाय घेतला, पण जाता जाता त्यांनी मोलाचा जीवनसंदेश दिला. 'अशी तपश्चर्या केल्याशिवाय प्रकाश दिसणार नाही.'


प्रामाणिक कष्टावर अण्णांची नितांत निष्ठा होती. डोक्यावर शिरस्त्राण नाही, पायात पायताण नाही, अशा अवस्थेत रानोमाळ भटकत अण्णांनी मुले गोळा केली. दगडटोळ्यांतून सुंदर जीवनशिल्पे घडविली. त्यांना आत्मनिर्भरता, आत्मप्रतिष्ठा दिली. या शिष्यांचेच पुढे काही शिल्पकार झाले. शिलेदार झाले. दिव्याने दिवा प्रज्वलित करावा. तसे वटवृक्षाच्या पारंब्या पारंब्यांतून अनेक महावृक्ष निर्माण झाले. अण्णांचे नाव उंचावले. भारत सरकारने 'पद्मभूषण' तर पुणे विद्यापीठाने 'डी. लिट्' देऊन त्यांना सन्मानित केले. अण्णांच्या पश्चात संस्थेने 'शाहू पुरस्कार' प्राप्त केला. ज्यांच्या प्रेरणेतून अण्णांनी शिक्षणाचा प्रपंच मांडला, त्यांच्याच नावाचा पुरस्कार संस्थेला लाभावा हा कार्याचा उचित गौरव आहे.


“विद्या प्रबोधिनी'च्या माध्यमातून एका बाजूला कर्मवीरांच्या विचारांचे नवे शिलेदार निर्माण होत आहेत, तर दुसऱ्या बाजूला शिक्षणाचाच बाजार मांडणारे नवे सम्राट निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत अज्ञानाचा अंधार चिरणाऱ्या या बलदंड ज्ञानभास्कराला आता यापुढे सन्मानित ठेवायचे आहे ते त्यांच्याच विचारांची पूजा बांधणाऱ्या रयतेच्या उगवत्या प्रकाशपुत्रांनी यासाठी श्रमाला आणि श्रमिकाला प्रतिष्ठा देणारा 'स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र प्रत्येकानेच जीवनाचे ब्रीद म्हणून कृतीतून जपायला हवा आणि हाच कुलगुरूंचे गुरू असणाऱ्या कर्मवीरांचा आदेश आहे, संदेश आहे.

Previous Post Next Post