शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे | Dr Bapuji Salunke Untold History


शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे


ज्ञान ही शक्ती आहे. शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार आहे. पण महाराष्ट्रातला बहुसंख्य वर्ग ह्या प्रवेशद्वारापासून वंचित होता. या वर्गाला शिक्षणाचे प्रवेशद्वार खुले करून देण्यासाठी महात्मा फुलेंनी लढा उभारला. राजर्षी शाहू, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख आदीनी हा लढा पुढे चालविला, स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी याच लढ्याची परंपरा प्राणपणाने जपली स्वातंत्र्याचा सूर्य माथ्यावर तळपत असला, तरी जेथे ज्ञानाची पहाट उगवली नाही तेथे आपण ज्ञानदीप लावूया, या उदात्त ध्येयाने मानवी जीवन उन्नत करण्यासाठी बापूजी साळुंखे महाराष्ट्राच्या कडेकपारी हिडले. लोकांच्या मनात आधुनिक युगाच्या नव्या जाणिवा जागृत केल्या. कराडच्या कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर १९ ऑक्टोबर १९५४ रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. बापूजीनी संस्थेसाठी 'ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार' हे ब्रीद घेऊन आपल्या शैक्षणिक धोरणाचे दर्शन घडविले.


सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील रामापूर गावी एका संस्कारसंपत्र सुभेदार घराण्यात बापूजी साळुंखे यांचा जन्म झाला. ९ जून १९१९ ही त्यांची जन्मतारीख, गोविंद हे त्यांचे मूळ नाव. ज्ञानोजीराव हे त्यांच्या वडिलांचे नाव, अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी नियतीनेच हा ज्ञानदूत धाडला होता. गोविंद जिद्दी, धाडसी होता. ज्ञानोजीराव धार्मिक वृत्तीचे, परोपकारी गृहस्थ होते. त्यांचा संस्कार गोविदावर झाला. पण प्रेमळ आईवडिलांच्या कृपाछत्राखाली फार काळ बागडण्याचे सौख्य गोविदाला लाभले नाही. बालपणातच आईवडील वारले. कृपाछत्र हरपले. गोविदाचा चुणचुणीतपणा, बाणेदारपणा पाहून शिक्षक मंडळी बेहद खुश व्हायची. पण याच गोविदासमोर सातवीनंतर शिक्षणाला रामराम ठोकावा अशी परिस्थिती निर्माण झाली. शिक्षणात राम पाहणाऱ्या या रामापूरच्या पोराने, जिद्द न हरता पुढील शिक्षणासाठी पायपीट करत इस्लामपूर गाठले. तेथे काही काळ चुलत्यांचा आधार गवसला, पण त्यांनीही बिन्हाड दुसऱ्या गावी हलवले. मग इस्लामपुरातच श्रीराम मंदिरात राहून गोविंदाने शिक्षणाचा मंत्र जपला. वार लावून जेवण व मन लावून अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेत गुणवत्ता शिष्यवृत्ती पटकावून कोल्हापूरची वाट पकडली. राजर्षी शाहू महाराजांच्या 'प्रिन्स शिवाजी बोडिंग'चा आधार लाभला. गोविदाची 'साधी राहणी व उच्च विचारसरणी पाहून राजाराम कॉलेजच्या मित्रमंडळीनी गोविदाचे 'बापूजी' असे नामकरण केले.


इतिहास संशोधक व शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी बापूजीच्यातील अभ्यासू वृत्ती ओळखली व बी.ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर इतिहास संशोधनासाठी, त्यांनी बापूजीना म्हैसूर राज्यातील सोडूर संस्थानात धाडले. बापूजीच्या अंतःकरणातील समाजनीती व मस्तकातील ज्ञानाची गतो पाहून सोडूरच्या संस्थानिकांनी बापूजीना 'राजगुरू पद बहाल केले. शिवतीर्थ पॅलेसमध्ये राहून है राजगुरु राजपुत्रांना ज्ञानतीर्थ देऊ लागले. इकडे ४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात देश पेटून उठला होता..

Read Also

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा इतिहास 

म. गांधींनी इंग्रजांना 'चले जाव'चा आदेश दिला नि सान्या भारतीयांना एक होण्याची हाक दिली. ही हाक बापूजींना आपली भूक वाटली आणि ते राजवाड्यातून थेट रणांगणावर आले. स्वातंत्र्याच्या लढयात, भूमिगत चळवळीत अग्रभागी झाले. त्यांची धडाडी व निधडे देशप्रेम पाहून त्यांना १९४५ मध्ये सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले. देश स्वतंत्र झाला. बापूजींनी सातारा जिल्ह्याच्या क्रांतीचा इतिहास हा ग्रंथ अक्षरबद्ध करून आपल्या प्रज्ञा प्रतिभेचे उत्कट दर्शन घडविले.


स्वातंत्र्यानंतर काही काळ बापूजी, शिक्षक-मुख्याध्यापक, आजीव सेवक या नात्याने रयतेच्या वटवृक्षाखाली वावरले. आपल्या उपक्रमशीलतेला, महत्त्वाकांक्षेला मर्यादा पडताहेत हे पाहून त्यांनी 'विवेकानंद संस्थेचा स्वतंत्र संसार घाटला. स्वतःकडचे ९०० रुपये, पंथविक्रीचे ४००० रुपये, पत्नीचे दागदागिने, विद्यार्थ्यांनी दिलेली गुरुदक्षिणा त्यांनी संस्थेच्या उभारणीसाठी वापरली. आज ३०० च्या वर विद्यालये, महाविद्यालये व हजारो गुरुदेव कार्यकर्ते बापूजींचा


ज्ञानवसा जपताहेत. महात्मा गांधी हे बापूजींच्या जीवनाचे प्रेरणास्थान होते. अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालणारे ज्ञानेश्वर- विवेकानंद हे त्यांचे आदर्श होते. कोल्हापुरातल्या  साध्या परात शेवटपर्यंत आयुष्य कंठणाऱ्या बापूजीनो, सामान्य शिक्षकाचे वेतन घेऊन संस्था कार्य केले. सत्कारप्रसंगी गुरुदक्षिणा म्हणून लाभलेले लाखो रुपये त्यांनी संस्थेलाच अर्पण करून त्यागभावनेचे प्रत्यंतर पडविले. संस्थाविस्तार करताना त्या त्या भागातील समाजसेवकांचा आधार घेतला. समाजमैत्री वाढविली. 'माणसे जोडण्याची हातोटी, कामाची चिकाटी व आर्थिक सचोटी' ही त्यांची तत्त्वप्रणाली होती. त्यांनी थाटामाटाला थारा दिला नाही. बिनइस्त्रीचा खादीचा स्वच्छ लेंगा, पांढरा शर्ट, खांद्यावर शाल आणि डोईवर गांधी टोपी परिधान करून त्यांनी अथकपणे शिक्षण प्रसार केला. वेळप्रसंगी मिळेल ते अत्र, मिळेल तितकेच खाल्ले, मिळेल त्या गाडीने पुढचे गाव गाठले. संस्थानिकासारखे जीवन जगण्याची संधी असताना ते संन्याशासारखे धवल नि मंगल जीवन जगले. ते संस्कृतचे व्यासंगी व मराठी व्याकरणाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी स्वतः संस्थेसाठी रचलेल्या प्रार्थनेत, राम, कृष्ण, रहिम, ख्रिस्त, बुद्ध यांना मानव्याचे दीपस्तंभ म्हटले आहे. आणि सत्य, शील, प्रामाणिकपणा, त्याग, सेवा या मूल्यांचा संदेश दिला आहे.


बापूजींच्या उतारवयातील एक प्रसंग मोठा उद्बोधक आहे. वाढत्या आजाराचा खर्च लक्षात घेऊन संस्थेने बापूजींच्या निवृत्ती वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव, तत्कालीन संस्था अध्यक्ष वसंतदादा पाटील यांच्यापुढे ठेवला. दादांनी तो तात्काळ मान्य केला. त्यानुसार वाढीव निवृत्ती वेतनाचे पाकीट, बापूजींच्या अपरोक्ष त्यांच्या धर्मपत्नी व संस्थामाता सुशीलादेवी यांच्या हाती देऊन संबंधित संस्थासेवक चटकन निसटले. नंतर पैसे मोजताना ही गोष्ट बापूजींच्या लक्षात आली. आजारपणात घड उभे राहता येत नसतानाही ते संस्था कार्यालयाकडे निघाले. कोणा रिक्षावाल्याची मानवता जागी झाले. त्याने बापूजींना संस्थेच्या दारात सोडले.


बापूजीच्या अचानक आगमनाने संस्थेतील मंडळी दचकली, बापूजी भलतेच संतापले होते. आर्थिक व्यवहारात सदैव काटकसर व सचोटीचे व्रत जपणाऱ्या बापूजीना हो मेहरबानी पसंत नव्हती. संस्थाकुटुंबप्रमुख प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा. आमदार गजेंद्र ऐनापुरे, सुरेश पाटील, प्राचार्य हणमंतराव पाटील, एन. के. डुके, एन. जी. गायकवाड, उत्तमराव यादव, मानसिंगराव जगताप आदी संस्थेच्या आजीव सेवकांनी वस्तुस्थिती समजावून सांगितली. शेवटी वसंतदादांचे नाव सांगून त्यांनी बापूजीना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण सारेच प्रयत्न विफल झाले. निवृत्ती वेतनातील वाढीव रक्कम परत करीत बापूजींनी खडसावून  सांगितले, "माझे चेतन वाढविण्याचा अधिकार तुम्हा कोणालाय नाही आणि ते घेण्याचा अधिकार मला नाही. माझ्या संस्थेतला निवृत्त शिक्षक ज्या वेतनावर जगतो. त्या वेतनावर मी का जगू नये?"

also read

शिवनेरी किल्ल्याचा शिवजन्मापूर्वीचा इतिहास | शिवनेरी किल्ला कोणत्या राजाने व का बांधला? | जाणून घ्या |

अशा सामाजिक न्यायाने जगणारे बापूजींसारखे शिक्षण संस्थापक आज व यापुढेही दुर्मिळ! आम्हाला 'बापूजी सांगता येतील, पण बापूजी होता येणार नाही' हेच सत्य


सुवर्णमहोत्सव साजरा करणारी 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था हो शैक्षणिक इतिहासातील सुवर्णपान आहे. अध्यात्माची बैठक आणि विज्ञानाची दृष्टी असणारे अनेक 'विवेकानंद' आपल्या संस्थेतून निर्माण व्हावेत, त्यांच्याकडून राष्ट्रउभारणीचे कार्य व्हावे ही बापूजीची संस्था उभारण्यामागे भूमिका होती. त्यांचा हेतू किती सफल झाला, याचे चिंतन आपण केले पाहिजे.


आज निष्ठेच्या नावाखाली लाचारीचे पीक वाढले आहे. निष्ठा हो महापुरुषांच्या विचारांवर असली पाहिजे. ज्या महामानवांच्या त्यागातून आपले जीवन प्रतिष्ठित झाले, त्यांच्यासाठी आपण कृतीच्या पातळीवर काय करतो, हे महत्त्वाचे आहे. शिक्षणमहर्षीच्या विचारांचा वसा जपणारे गुरुदेव कार्यकर्ते हेच त्यांचे खरे वारसदार असतात, तेच समाज आणि संस्कृती यांचे वैभव वाढवीत असतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हाच समाजाचा नेता असतो, ही बापूजीची धारणा होती.


बापूजी ताठ कण्याने जगले. आपल्या अंगभूत तत्वज्ञानापासून कधी ढळले नाहीत. स्वतःसाठी सोईस्कर तत्त्वज्ञान स्वीकारून कडक कांजीच्या पांढऱ्याशुभ पोशाखात मानवतेवर कोरडी व्याख्याने देत हिडले नाहीत. त्यांची एकेक मानवतावादी कृत्ती हजारो व्याख्यानांपेक्षा श्रेष्ठ होती. महाराष्ट्र शासनाने 'दलित मित्र' तर शिवाजी विद्यापीठाने 'डी. लिट्.' पदवी देऊन त्यांच्या सेवाकार्याचा सार्थ गौरव केला. अज्ञानाचे अंधारे कोपरे प्रकाशमान करणारा हा ज्ञानसूर्य ८ ऑगस्ट १९८७ रोजी मावळला असला तरी या ज्ञानसूर्याची ज्ञानमंदिरे मात्र समाजाला सदैव संस्काराचे सामर्थ्य देत राहतील.

Previous Post Next Post