वि. वा. शिरवाडकर|Vi.Va.Shirvadkar untold history |

 


वि. वा. शिरवाडकर


"नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत. पण त्याहून सुंदर आहे तो माणूस. म्हणूनच माथ्यावर आभाळ व पायाखाली रस्ता घेऊन माणसासाठी जगावंस वाटतं." हे उत्कट उद्गार आहेत. कविवर्य कुसुमाग्रज यांचे कुसुमाग्रज म्हणजे माणसाविषयीची स्नेहधारा सदैव पाझरत असलेले रसरशीत व्यक्तिमत्त्वा 'कुसुमाग्रज' या नावाने त्यांनी काव्यलेगी कोरली. 'वि. वा. शिरवाडकर नावाने ललितरम्य लेखन केले, तर 'तात्यासाहेब' नावाने माणसांच्या मैफिलीत रमले. तात्यासाहेब हे मराठी मातीला तेजाळ अस्मिता देणारे अक्षरांचे नक्षत्र आहे. भाऊसाहेब खांडेकरांनी त्यांचा 'मानवतावदी कवी म्हणून सार्थ गौरव केला. भाऊसाहेबांनंतर तब्बल चौदा वर्षांनी मराठी भाषेला तात्यासाहेबांनी 'ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून दिला व रसिकांच्या प्रेमपर्जन्याचा अनुभव घेतला.


नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे हे तात्यासाहेबांचे गाव २७ फेब्रुवारी १९१२ ही त्यांची जन्मतारीख तात्यासाहेबांच्या जन्मवर्षातच त्यांचे वडील रंगनाथराव वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले व एका सरस्वती उपासकांच्या आगमनाने शिरवाडकर कुटुंबावर लक्ष्मी प्रसन्न झाली. तात्यासाहेबांचे मूळ नाव गजानन, पण वामनराव शिरवाडकर कुटुंबाने त्यांना दत्तक घेतल्याने गजाननाचे विष्णू झाले. दत्तक देताना वडिलांनी शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलगा माझ्याकडेच राहील अशी अट घातली नसती, तर तात्यासाहेब जिमीनदार शिरवाडकर झाले असते, पण त्यामुळे मराठी मातीचा गौरव करणारे 'नाटककार शिरवाडकर मात्र आपल्याला भेटले नसते. नियतीचा महिमा म्हणतात तो हाच


तात्यासाहेबांनी नाशिकच्या नावाला नवलाई प्राप्त करून दिली. याच पवित्र भूमीत त्यांचे शालेय व महाविद्यालयीन जीवन पडले. स्वत:चे संपादन असलेल्या शालेय हस्तलिखितामध्ये त्यांच्या पहिल्या कवितेने जन्म घेतला. त्यावेळी त्यांना अधिक वेड होते, ते नाटकाचे नि क्रिकेटचे! तोंडाला रंग फासून त्यांनी एक-दोन  नाटकांत कामही केले. त्यांनी कोणत्या तरी एका नाटकात 'तू शेवटी तुझे दात माझ्याच पशात घातलेस' असे म्हटल्याने सारे प्रेक्षागृह हास्यकल्लोळात बुडाले आणि तात्यासाहेबांनी नाटकाचा नाद सोडून दिला ते कवितेकडे वळले. महाविद्यालयात असताना ध्रुव मंडळातर्फे त्यांचा 'जीवनलहरी' काव्यसंग्रह प्रकाशित झाला.


राम गणेश गडकरी हे त्यांचे दैवत महकन्यांच्या साहित्य खजिन्यावर त्यांचा साहित्यपिंड पोसला गेला. म. फुले, आगरकरांनी त्यांच्यातला सत्यशोधक जागविला. त्यामुळेच काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी जो सत्याग्रह झाला त्यात ते माणुसकीच्या नात्याने सक्रिय सहभागी झाले. सनातन्यांच्या हिंस हल्ल्यातून दलित वृद्धाला सोडविताना स्वतः जखमी झाले. 'मानवता' हा त्यांच्या केवळ काव्याचाच नव्हे, तर जगण्याचा अविभाज्य भाग होता.


बी.ए.ची पदवी संपादन केल्यावर त्यांना सिनेसृष्टीच्या मायाजालाने आकर्षित केले. 'सती सुलोचना' चित्रपटात त्यांनी लक्ष्मणाची भूमिका केली, पण लक्ष्मणाप्रमाणेच चित्रपटाच्याही वाट्याला बनवास आला आणि तात्यासाहेब वृत्तपत्रसृष्टीकडे वळले. दै. 'सकाळ'च्या प्रभा साप्ताहिकात नोकरीला लागले. पण एका ठिकाणी ते रमले नाहीत. "सा स्वदेश'मुळे ते नाशिकात स्थायिक झाले. मधल्या काळात दै. 'प्रभात'मध्ये स्थिरावले होते. रमले होते. १२ जुलै १९३९च्या रात्री टेलिप्रिंटरवर एक युद्धजन्य प्रक्षोभक राजकीय बातमी आलो. तात्यासाहेबांचे रक्त सळसळले. लेखणी सरसावली नि क्रांतीचा गर्जा जयजयकार हे अजरामर स्फूर्तिकाय जन्माला आले. डमडमच्या तुरुंगात या नावाने ते 'ज्योत्स्ना' मासिकात झळकले. मानवी मने परथरली. कवी म्हणून त्यांचा बहारीचा काळ सुरू झाला. 'विशाखा' काव्यसंग्रहाने त्यांना उदंड कीर्ती मिळवून दिली.

read also

डॉ. आनंदीबाई जोशी

काव्याबरोबरच त्यांनी कथा, कादंबरी, नाट्यलेखन केले. 'नटसम्राट'ने त्यांना रसिकांचा राजा बनविले. एक कवी-कलावंत आणि मनस्वी माणूस म्हणून लोकांनी तात्यासाहेबांवर उदंड प्रेम केले. लोकसंवाद ही त्यांच्या लिखाणाची कच्ची सामग्री होती. त्यांनी मनमुरादपणे सामाजिक जीवनाचा, निसर्गाचा आस्वाद घेतला व अत्यंत कल्पकतेने व कलात्मकतेने तो साहित्यातून मांडला. आशयात त्यांनी विविधता जपली. उपड्या पोरांपासून ते निधड्या नेत्यापर्यंत गवताच्या पाल्यापासून ते क्षितिजापर्यंत, गटारगंगेपासून ते सूर्य-चंद्रनक्षत्रापर्यंत त्यांनी तौलया संचार केला. तात्यासाहेबांच्या साहित्यसेवेचा सन्मान पुणे विद्यापीठाने 'डी. लिट् पदवी देऊन केला तर साहित्य संस्कृती मंडळाने 'गौरव वृती' प्रदान करून सत्कार केला. तात्यासाहेबांच्या अनेक ग्रंथांना राज्य पुरस्कार, साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले. त्यांच्या नावाने कार्यरत असलेल्या 'कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्यिक, वाचनालये नि आदिवासी मंडळांना प्रोत्साहन मिळाले व मिळते आहे. हा तात्यासाहेबांचा खरा गौरव आहे.


तात्यासाहेबांच्या केवळ एका पत्रावर शिरवाडे गावची सरकारी दप्तरात ताटकळलेली पाणीयोजना तात्काळ मंजूर झाली नि गावात गंगा अवतरली. ही त्यांची शब्दकिमया आहे. नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष असताना तात्यासाहेबांनी साहित्य व सांस्कृतिक उपक्रमाबाबत शासनाची उदासीनता यशवंतराव चव्हाण यांच्या नजरेस आणून दिली. ते म्हणाले, "चित्रातील सरस्वतीच्या हातात बीणा आहे. पण प्रत्यक्षात आज सरस्वतीच्या हातात झोळी आहे." यशवंतरावांबद्दल तात्यासाहेबांना विशेष आदर होता. त्याच कार्यक्रमात यशवंतरावांनी वाचनालयाला दोन लाख रुपर्याचे शासकीय अनुदान जाहीर करून एका सरस्वती उपासकांच्या शब्दांचा यथोचित सन्मान केला. मस्तकावर मुकुट आणि अंगावर लक्तरे घेऊन मंत्रालयाच्या दाराशी उभ्या असलेल्या मराठी भाषेची कैफियत तात्यासाहेबांनी मराठी जागतिक परिषदेत मांडली.

must read

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे

तात्यासाहेब हे संवेदनशील मनाचे कवी होते. ते मिश्कील माणूसवेडे गृहस्थ होते. त्यांच्या बालवयापासून ते मृत्यूपर्यंतच्या आठवणी व साहित्य प्रवास यांचा भावस्पर्शी मागोवा 'तो प्रवास सुंदर होता या ग्रंथात त्यांच्या बंधूंनीच घेतला आहे. तात्यासाहेब राजकीय प्रवाहापासून दूर होते, पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मात्र ते आघाडीवर होते. या चळवळीतील सत्याग्रहीनी मिरवणुकीने जाऊन अटक करवून घेण्याचा कार्यक्रम आखला होता. यातील एका कवीचा सहभाग हा लोकांच्या कुतूहलाचा नि कौतुकाचा विषय होता, पण खुद्द तात्यासाहेबांच्या पत्नी मनोरमाबाई यांनाही याचे आश्चर्य वाटले होते. त्या शिक्षिका होत्या. त्यांनी शाळेत जाताना सत्याग्रही पतीला सांगितले, "संध्याकाळी लवकर घरी या, उगाच इकडे तिकडे जाऊ नका. मी तुमच्या आवडीची कारल्याची भाजी करणार आहे." शेपू, कारले या इतरांच्या नावडत्या भाज्या तात्यासाहेबांच्या खास आवडीच्या होत्या. त्यामुळे कोर्ट उठेपर्यंत अटक झालेले हे सत्याग्रही भाजीच्या ओढीने कोर्ट उठल्या उठल्या तडक घरी आले. 'पिठलंभाकरी' हा तात्यासाहेबांच्या खास आवडीचा बेत होता. त्यांना भजीही आवडायची.  एकदा वसंतराव व सिंधुताई कानेटकर यांच्यासमवेत मुंबईहून येताना तात्यासाहेबांनी गाडी एका हॉटेलासमोर बांबवली. तिथली भजी त्यांना आवडायची. पण तिथल्या आचान्याचा अवतार व हॉटेलातला कळकटपणा पाहून सिंधुताई म्हणाल्या, "अहो तात्या त्या भजी करणाऱ्या माणसाच्या अंगावरचा टॉवेल तरी बघा किती घाणेरडा!" तात्या लगेच म्हणाले, "सिंधुताई, आपले कसे अर्जुनासारखे असावे, त्याला बाण मारताना पक्ष्यांचा फक्त डोळाच दिसत होता. तशी आपल्याला फक्त भजीच दिसली पाहिजेत."


असे कलंदर वृत्तीने जगणारे तात्यासाहेब मनोरमाबाईच्या निधनाने एकाको झाले. रक्तदाब आणि दमा हे आजार संगतीला घेऊन स्वगत गात राहिले. 'बन्दे एक नाट्य', 'स्वातंत्र्यदेवतेला आवाहन इ. काव्यांतून समाजवास्तवतेचे विदारक चित्र रेखाटत राहिले. त्यांच्या जीवनलहरी ते महावृक्ष' हा काव्यप्रवास मराठी कवितेला नवे बळ देणारा ठरला आहे. जमिनीवर जगणाऱ्यांना छाया आणि आकाशातल्या रहिवाशांना माया देणारा महावृक्ष हा तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. तो परिसराचा तारणहार पृथ्वीचा पुत्र नि नक्षत्रांचा सांगाती आहे.


महावृक्षाचा मृत्युलेख लिहिणान्या तात्यासाहेबांचे 'इच्छापत्र' हे मानवतेचे सुंदर उदाहरण आहे. आपल्या घरात काम करणाऱ्या माणसांनाही आपल्या मिळकतीत वाटा देणाऱ्या या उदार कविवर्याचे जीवन म्हणजे प्रेम, करुणा, सहिष्णुता यांचे मूर्तिमंत काव्यच आहे.


जाता जाता गाइन मी


गाता गाता जाइन मी


गेल्यावरही या गगनातिल


गीतांमधुनी राहिन मी." हे काव्यबोल तात्यासाहेबांनी सार्थ ठरविले. आपल्या शब्दज्योतींनी त्यांनी मानवी मनातले अग्निकण फुलविले. माणसातल्या सत्याचे, शिवाचे, सुंदरतेचे दर्शन पढविले. साहित्यसृष्टीत मुक्तपणे संचार करणान्या या प्रवासी पक्ष्याने १० मार्च १९९९ या दिवशी आपले पंख मिटले. आता हा पक्षी प्रकाशाची अक्षरे मागे ठेवून नक्षत्राच्या रूपाने आकाशनगरीत नांदतो आहे.

Previous Post Next Post