नाना शंकरशेट | Nana Shankar sheth | Untold history of nana shankar sheth |



नाना शंकरशेट


आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही सुंदर आणि समृद्ध करण्यात ज्या नवरत्नांनी मौलिक योगदान दिले. त्यामध्ये जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे स्मरण आजही कृतज्ञतेने केले जाते. 'मुंबईचे अनभिषिक्त सम्राट' म्हणून नानांचा गौरव आचार्य अत्रे यांनी केला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे नानांचे मूळगाव, तर मुर्कुटे हे त्यांचे उपनाम नानांचे पणजे गजाबाशेट हे अठराव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईत स्थायिक झाले. व्यापारी पेढीत त्यांची मोठी पत होती. परिसरात मोठा नावलौकिक होता. नानांच्या वडिलांनी स्वकर्तृत्वाने वैभवात भर घातली. नाना तारुण्याच्या उंबरठ्यावर उभे असताना त्यांच्या वडिलांनी देह ठेवला, असे म्हणतात, त्यांनी नानांसाठी १८ लक्ष रुपये आणि मोठी स्थावर जंगम मागे ठेवली होती. नानांचे वैशिष्ट्य हेच की, त्यांना धनाच्या श्रीमंतीबरोबरच मनाची श्रीमंती लाभली होती. कर्तृत्व आणि दातृत्व यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाने साधला होता.


पेशवाई बुडाली, तेव्हा नाना अवघे पंधरा वर्षांचे होते. माऊंट स्टुअर्स एल्फिन्स्टन हे मुंबईचे पहिले गव्हर्नर झाले होते. त्यांना मुंबईला भौतिक, सांस्कृतिकदृष्ट्या सुंदर आकार द्यायचा होता. 'आपण जनतेचे मित्र आहोत' ही प्रतिमा निर्माण करावयाची होती आणि नानांना जनतेचे हित साधावयाचे होते. पण त्या काळी स्वजनांचे शत्रुत्व पत्करल्याशिवाय परकीय राज्यकर्त्यांचे मित्रत्व लाभत नव्हते. स्वजनांशी द्रोह न करता परकीयांशी मैत्रीचा हात पुढे करणारे नाना, प्रांजळ व प्रजाहितदक्ष नेते होते. एल्फिन्स्टन यांना नानांचा हात अधिक विश्वासक वाटला. नानांनी इंग्रजी साहेबांना ठाम शब्दांत सांगितले, "आपल्याला खरोखरच आमच्या लोकांचा उद्धार करावयाचा असेल, तर विद्यादान हाच एकमेव मार्ग आहे. नानांचा सल्ला साहेबांनी मानला आणि आपल्या पद्धतीने, मिशनन्यांमार्फत शिक्षणप्रसाराला प्रारंभ केला; पण मिशनरी व मराठमोळी मंडळी  यांच्यात काही केल्या ताळमेळ बसेना. यावर नानांनी शांत चित्ताने विचार करून, स्वतःच पुढाकार घेऊन १८२२ मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर, सदाशिवपंत छत्रे आदी मंडळीनी नानांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावला.


काळाची पावले ओळखून उपक्रमशीलता दाखविणारे नाना शंकरशेट है। मराठी मातीला लाभलेले कर्तृत्वाचे लेणे आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अव्वल इंग्रजी अमदानीत अब्बल दर्जाची विद्वान पिढी निर्माण होऊ लागली. त्यातले कित्येक नाटककार, लेखक, नेते म्हणून नावारूपाला आले. यात 'एल्फिन्स्टन कॉलेज' उभारून मुंबईच्या या पहिल्या गव्हर्नरांचे नाव लोकांच्या नजरेसमोर कायमस्वरूपी ठेवले. हे कॉलेज उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन साडेचार लाख रुपयांचा फेड जमविला होता. एल्फिस्टन यांच्यानंतर नानांच्या ज्ञानकार्याला सर रॉबर्ट अँट या गव्हर्नरांनी मोलाची मदत केली. त्यांचेही चिरंतन स्मारक नानांनी 'ग्रँट मेडिकल कॉलेजच्या रूपाने उभे केले. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचे ऋण फेडण्यासाठी मराठी माणूस हा जात, धर्म, पंच आणि प्रांत यापलीकडे कसा जातो, याचे सुंदर प्रत्यंतर नानांनी परकीय मंडळीना घडविले.


नानांनी १८४५ मध्ये 'स्टुडंट्स लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटी' संस्थेची उभारणी केली. यामध्ये त्यांना दादाभाई नौरोजी यांचे मार्गदर्शन लाभले. १८४८ मध्ये नानांनी स्वतःच्या घरात मुलीची शाळा सुरू करून मुंबई प्रांतात स्त्रीशिक्षणाचा पाया पातला, नानांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते. त्यांची विलक्षण ज्ञानदृष्टी पाहून इंग्रज सरकारने त्यांची मुंबई युनिव्हर्सिटीचे फेलो म्हणून नेमणूक केली. व्हिक्टोरिया राणीने त्यांना 'जस्टिस ऑफ पीस म्हणजेच जे.पी. करून खास सन्मान केला होता.

also read

डॉ. आनंदीबाई जोशी | Dr Anandibai Joshi | The untold history of anandi bai joshi the first women doctor in the india

नाना हे लक्ष्मीपुत्र असले, तरी सरस्वतीचे विनम्र उपासक होते. ते जनतेचे प्रगल्भ नेते होते. विधायक दृष्टी ठेवून आणि निश्चित कार्यक्रम घेऊन त्यांनी राजकारण केले. त्यांच्या राजकारणाला सामाजिक समृद्धीचा ध्यास होता. समाजकारणाचा सुवास होता. सतीची अमानुष चाल बंद करण्यासाठी त्यांनीच लोकप्रबोधन केले. राजकारणाच्या प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज ओळखून त्यांनी 'बॉम्बे असोसिएशन' नावाच्या राजकीय संस्थेला जन्म दिला. समाजाचे दुःख, वेदना, आडचणी ब्रिटिश पार्लमेंटसमोर मांडाव्यात व रयेतेचे कल्याण करावे, हा संस्थेचा प्रमुख हेतू होता. या संस्थेतूनच पुढे 'हिंदी राष्ट्रीय सभा' जन्माला आली. मुंबईत दळणवळण साधने निर्माण व्हावीत, म्हणून नानांनी रेल्वेचा पाठपुरावा केला. पहिल्या मुंबई-ठाणे रेल्वेचे ते पुरस्कर्ते होते. रेल्वे कंपनीचे ऑफिसही नानांच्या घरात होते. बावनकशी सोन्याचे गुण अंगी असलेल्या नानांना, कोटेही प्रवास करण्यासाठी रेल्वे कंपनीने सोन्याचा पास दिला होता.


मुंबई शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी जे 'म्युनिसिपल कमिशन' नेमण्यात आले होते. त्यात नानांची नेमणूक हा त्या कमिशनचा गौरव होता. या कमिशनचेच रूपांतर पुढे 'म्युनिसिपल कॉर्पोरेशन' मध्ये झाले. एकूणच मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक आरोग्यासाठी नानांनी आपले आयुष्य वेचले. पदरमोड केली. मुंबईची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठ्याची योजना आखली. चिचपोकळी भागात त्यांच्याच प्रयत्नाने गॅसकंपनी निर्माण झाली. तलाव, नाटगृहे, धर्मशाळा, राणीचा बाग आणि बागेतील वस्तुसंग्रहालय उभारणीमध्य नानांचा वाटा सिंहाचा होता.


टाऊन हॉलमधील प्रचंड ग्रंथालय हे नानांच्या ज्ञानसंस्कृतीवरील प्रेमाचे प्रतीक आहे. अशा या मुंबईच्या शिल्पकाराचा गौरव याच टाऊन हॉलमध्ये थाटामाटात संपन्न झाला. नानांच्या हयातीतच लोकांनी नानांचा पुतव्य उभारून त्यांच्या लोकसेवेला विनम्र मानवंदना दिली. रयत आणि सरकार यांच्यामध्ये सन्मानाचे अढळ स्थान निर्माण करणारे नाना शंकरशेट हे विधात्याने धाडलेले मानवतेचे शिल्प होते. मुंबईचे भूषण असणारे नाना महाराष्ट्राचे आभूषण होते.


सामाजिक सुसंवाद आणि सलोखा ही नानांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. सामाजिक हितासाठी संघर्ष व समेट करण्याची हातोटी त्यांना साधली होती. यासंदर्भात १९३७ मधील घटना उद्बोधक आहे.


भिवंडी येथील विठ्ठल मूर्तीच्या विटंबनेवरून हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगल उसळली होती. नानांनी जातीने लक्ष घालून समाजविघातक प्रवृत्तीचा न्यायालयामार्फत चोख बंदोबस्त केला. गुजरातमधील काठेवाडातील द्वारकेच्या मंदिरातील मूर्ती भ्रष्ट करणाऱ्या भंजकांना गव्हर्नरांकडून कठोर शासन केले आणि श्रद्धाभावाने पुन्हा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून सामाजिक सद्भाव वाढविला. नानांच्या नेतृत्वात बुद्धीची चमक होतो. संकल्पसिद्धीची धमक होती. त्यांचा

also read

v

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे | Dr Bapuji Salunke Untold History

सरकारदरबारी प्रचंड दबदबा होता. याचा एक प्रसंग मोठा भावपूर्ण आहे. कौन्सिलमध्ये क्वीन्स रोडवरील 'सोनापूर स्मशान' तेथून हलवून शिवडीला नेण्याचा ठराव आणला गेला होता. याच्या निषेधार्थ 'सोनापूर बंद' करण्यात आले. या घटनेने साऱ्या मुंबईत हाहा:कार उडाला होता. अशा स्फोटक   परिस्थितीत एका गुजराती वाण्याचे प्रेत त्यांच्या नातेवाईकांनी नानांच्या अंगणात आणून ठेवले. लोकांच्या जीवनातील नाना प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या नानांना ह्या स्मशानाच्या प्रश्नाने अस्वस्थ केले. त्यांनी प्रथाचे गांभीर्य ओळखले. अंगरखा, पागोटे घालून से तड़क गव्हर्नरकडे गेले. परिस्थितीची जाणीव करून दिली. गव्हर्नरांनी ताबडतोब 'सोनापूर स्मशानाचा हुकूमतह केला. त्यानंतर मूळ ठराव मागे घेतला गेला.


उद्यानापासून स्मशानापर्यंत जनहितांची काळजी घेणारे नाना खरे लोकत्र होते. ते अजातशत्रू होते. समाजकल्याणासाठी आपले तन-मन-धन वेचणाऱ्या या जगन्नाथाची १० फेब्रुवारी १८०३ रोजी सुरू झालेली जीवनयात्रा ३१ जुलै १८६५ या दिवशी थांबलो. नानांच्या पश्चात त्यांच्या विरंजीवांनी सुरू केलेली 'जगन्नाथ शंकरशेट स्कॉलरशिप सरस्वतीपुत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी उपकारक ठरली आहे.


मुंबापुरीच्या मातीवर कार्यकर्तृत्वाची मुद्रा उमटविणारे नाना शंकरशेट है। 'मानवतेचे महासागर' म्हणून चिरकाल वंदनीय राहणार आहेत.

Previous Post Next Post