विनायक दामोदर सावरकर
एखाद्या महापुरुषाच्या जीवनातील वादग्रस्त भाग वगळून आपणास त्याच्या जीवनातील उदात्त, भव्य असे काही निश्चित घेता येते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जीवनकहाणी जितकी वादळीच रोमहर्षक नि चित्तवेधक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी ज्या यातना, हालसोया त्या 'अग्निदिव्य' या सदरात मोडतात. २८ मे १८८३ जन्मदिवस सावरकरांचे वडील दामोदरपंत हे विद्याव्यासंगी, स्वाभिमानी व स्वच्छ मनाये गृहस्य होते. त्यांना साहित्यलेखनात विशेष रुची होती. त्यांनी विनायक बालमनावर छत्रपती शिवरायांच्या व राणा प्रतापांच्या पराक्रमाचा संस्कार केला. आईच्या आदेशाने वाचल्या गेलेल्या रामायण, महाभारताच्या कथांवर बाल विनायकाचा पिंड पोसला गेला.
विनायक सहा वर्षांचा असतानाच त्याला पडलेले प्रश्न मोठमोठ बुचकळ्यात टाकीत असत: अस्वस्थानच्या इतिहासाचे पुस्तक विनायकच्या हाती पडले, त्या पुस्तकांची सुरुवातीची पाने गायब झाली होती. विनायकाने पुस्तकाचा फडशा पाडला, पण गायब झालेल्या पानात काय असेल याची उत्सुकता त्याला लागली. त्याने वडिलांना प्रश्न विचारला, "यात निरंभ आहे. त्यापूर्वी अरबांची काय स्थिती असेल?" "पहिली पाने फाटली आहेत त्यात ते असेल" असे म्हणून वडिलांनी वेळ मारून नेली. विनायकने तो गायब झालेली पाने शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला, 'समजा ती पहिली पाने सापडली, तरी त्यापूर्वी काय होते हा प्रश्न उरणारख।' इतिहासाच्या आरंभिक पानांचा शोध घेणारा हा जिज्ञासू प्रज्ञावंत मुलगा पुढे स्वातंत्र्याच्या इतिहासात एक तेजस्वी पान होणार आहे, याची चुणूक त्यावेळी अनेक प्रसंगांतून येत राहिली.
दुष्काळ आणि प्लेग यांच्यापेक्षाही भयानक अत्याचारी असणान्या रेडसाहेबाला चाफेकर बंधूनी कायमची मुक्ती दिली आणि हातात गीता घेऊन फाशी स्वीकारली. या घटनेचा सावरकरांच्या बाल मनावर विलक्षण परिणाम झाला. त्यांचे वय त्यावेळी जेमतेम १४ वर्षांचे होते. त्यांनी रात्र जागवून हुतात्मा चाफेकर बंधूवर ओजस्वी पोवाडा रचला. दिव्याच्या प्रकाशात पोवाड्याचे अनेक वेळा वाचन केले. नजरेत अंगार आणि डोळ्यांत अश्रू दाटले. हुंदका आवरेना. वडील जागे झाले. त्यांनी विनायकाची अवस्था पाहिली. पुढ्यातला पोवाडा वाचला. ते भेदरले. लेकराला प्रक्षोभक विचारांपासून परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. हलकीफुलको गीते रचण्याचा सल्ला दिला. पण विनायकांचे गात्र न गात्र पेटून उठले होते. कोवळ्या वयातच त्यांनी दुर्गामातेच्या चरणी मस्तक ठेवून 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी सतत झगडत राहण्याची नि सर्वस्वाची आहुती देण्याची, प्रतिज्ञा केली. त्यातूनच पुढे क्रांतिकारक नेते म्हणून सावरकरांचे तुफानी व्यक्तिमत्त्व आकाराला आले.
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी नि प्रतिष्ठेसाठी लढा देणाऱ्या स्वा. सावरकरांच्या वाट्याला अंदमान बेटावरील काळ्या पाण्याची शिक्षा आली. पण तिथेही त्यांनी ज्ञाननिष्ठेचा जो सुंदर प्रत्यय पडविला आहे, तो उल्लेखनीय आहे. निरक्षर कैद्यांना साक्षर करण्याचा शैक्षणिक उपक्रम सावरकरांनी हाती घेतला. प्रारंभी तेथील सुशिक्षित बंदिवानांनी या उपक्रमास पूर्ण नापसंती दर्शविली, पण काळाची पावले ओळखण्याची कला सावरकरांनाच साधली होती. तसं पाहिलं तर शिक्षणासाठी तेथे स्वतंत्र वेळ मिळणे अशक्यच होते. मुळातच कैद्यांच्या देखरेखीवर असणाऱ्या बारीला कोणत्याही पवित्र कार्याची घृणा होती. स्वदेशी, स्वभाषा, स्वधर्म यांचा अभिमान बाळगणे हा त्यांच्यालेखी गुन्हा होता. कैद्यांना विकृत शिक्षा देण्यात मानसिक आनंद मानणारा हा बारी शिक्षणासाठी राजी होण्याची सूतराम शक्यता नव्हती; पण कैद्यांचे, पाण्याचे किंवा गवत कापण्याचे काम सुरू असताना सावरकरांची शिकवणी सुरू व्हायची. अत्यंत मुलभ भाषेत ते राज्यशास्त्र, भाषाशास्त्र, अर्थशास्त्रातील मूलतत्त्वांचे ज्ञान राजकैद्यांना द्यायचे. यात शक्यतो सावधपण बाळगले जायचे.
अंदमान तुरुंगात प्रत्येक कैद्याला दर रविवारी पुस्तक वाचायला मिळत असे, पण पुस्तकांची अदलाबदल करण्यास त्यांना परवानगी नव्हती. तसे काही केल्यास अघोरी शिक्षेला सामोरे जावे लागे. जेवणाची रांग मोडली, तर वर्षातून एकदा भरो पत्र लिहिण्याची सवलतही रद्द होई, अशा अवघड परिस्थितीत सावरकरांनी कैद्यांना शहाणे करण्याचा ध्येयवेडा उपक्रम आखला होता. सावरकरांच्या कोठडीची आठवड्यातून दोन-चार वेळा कसून तपासणी व्हायची. साधा कागदाचा कपटाही बाळगायला त्यांना परवानगी नव्हती. कविमनाच्या या स्वातंत्र्यवीरांना आपल्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी आधार घावला तो कोठडीच्या भितीचा घायपाताच्या काट्याने किंवा खिळ्याने मितीवर काव्यपंक्ती उतरायच्या, त्या पाठ करायच्या, त्यातून पुढे 'कमला' हे अक्षरलेणे जन्माला आले. पण बारीच्या नजरेला जेव्हा ही भितीवरची करामत दिसायची, तेव्हा सरकारी मालमत्तेचे नुकसान केले म्हणून सावरकरांना जबर शिक्षा भोगायला लागायचो.
सावरकरांनी बारीच्या विरोधाला न जुमानता, इंग्रज अधिकाऱ्यांकडे अंथसंग्रहाची मागणी केली. त्या अधिकाऱ्यांना ही ग्रंथसंकल्पना पसंत पडलो नि अंधारलेल्या त्या काळ्याकुट्ट विश्वात पुस्तकाच्या रूपाने ज्ञानाचा कवडसा आला. बंदिवानांना आपल्या नातेवाईकांकडून पुस्तके मागवायला परवानगी मिळाली. अंदमानच्या बेटावर ग्रंथांचा ओघ सुरू झाला. सावरकरांनी काळ्या पाण्याला प्रकाशाची किनार दिली. जे सुरुवातीला या ग्रंथमोहिमेपासून फटकून होते, तेही आता या मोहिमेत सहभागी झाले.
ग्रंथांच्या संगतीत कैद्यांचे एकाकीपण व भकासपणा दूर होऊ लागले. कित्येक कैदी मराठी, हिंदी, बंगाली वृत्तपत्रे, धार्मिक ग्रंथ वाचू लागले. त्यातल्या अनेकजणांना पुढे मुन्शी कारकुनाच्या जागा मिळाल्या. सावरकरांची ही ग्रंथालय मोहीम चांगलीच विस्तारली. ग्रंथालयातील रामकृष्ण विवेकानंदांच्या चरित्रयांनी कैद्यांची मरगळलेली मने पुन्हा चेतावली. शेक्सपियर, टॉलस्टॉय, रवींद्रनाथांच्या साहित्याने त्यांना नवी ऊर्मी दिली. सावरकरांनी अंदमान सोडताना साठ टक्के कैदी साक्षर झाले होते. तर तिथल्या ग्रंथालयात दोन हजार ग्रंथ जमा झाले होते. सावरकरांची हो ज्ञानक्रांतीच होती..
स्वा. सावरकरांच्या एकूण समाजकार्याचा गौरव पुणे-नागपूर विद्यापीठांनी 'डी. लिट्' पदवी देऊन केला. मुंबई विद्यापीठाने त्यांची १९११ मध्ये काढून घेतलेली बी.ए.ची पदवी १९६० मध्ये सन्मानाने परत केली. 'तुजसाठी मरण ते जनना तुजवीण जनन ते मरण' अशी स्वातंत्र्यदेवतेला ग्वाही देणाऱ्या स्वा सावरकरांची देशसेवा, साहसी वृत्ती, मातृभाषाभक्ती आणि ज्ञाननिष्ठा आपणास सदैव प्रेरणादायी आहे.