सुभाषचंद्र बोस
गुरुवर्य रवींद्रनाथांच्या एका कवितेत, एक माणूस गळ्यात लोखंडी साखळी अडकवून समुद्राच्या काठाने हिंडत असतो. गळ्यातील साखळी सोन्याची करण्यासाठी त्याला परिस हवा असतो. त्यासाठी तो हाताला येईल तो दगड उचलून साखळीला लावत असतो व बघत असतो. शेवटी दमतो विचारा! निराश होतो. नंतर सहजपणे साखळीकडे पाहतो आणि एकदम हरखून जातो. चकितच होतो. 'साखळी सोन्याची झालेली असते!' आपल्या हातून परिस कधी निसटून गेला, हे त्याला समजत नाही.
आपले आयुष्य सोनेरी करणारे असे अनेक परिस पुस्तकाच्या रूपाने आपल्याच आवतीभोवती विखुरलेले असतात. त्यांच्या आवर्जून सहवासात आले पाहिजे. मग आपल्याही लक्षात येणार नाही, आपले आयुष्य सोनेरी नि सुगंधित झाले कधी!
हा प्रसंग अशाच एका परिसाचा आहे. नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, नेताजींच्या वीरत्वाचं अद्भुत दर्शन घडतं, विश्वास पाटील यांच्या 'महानायक'मधून बालमनावर असलेला विवेकानंदांचा प्रभाव, तारुण्याच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर लाभलेला देशबंधू चित्तरंजन दास यांचा सहवास आणि स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास, यातून नेताजींचे विजेसारखे लखलखते व्यक्तिमत्व आकाराला आले. आजही ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. 'भूगोल ही परमेश्वराची देणगी असेल, तर इतिहास हे मानवाचे मनगट आहे'. या विधानाची सार्थ प्रचिती याच व्यक्तिमत्त्वातून येते. याच व्यक्तिमत्त्वाने अनेकांच्यातील चैतन्य जागविले. स्फुल्लिंग पेटवले.
-------------------------------------------------
Read also
-------------------------------------------------
स्वतःच्या मायभूमीच्या मुक्ततेसाठी ब्रिटिश हिंदुस्थानी लष्करामधून बाहेर पडून अनेक लढवय्ये वीर नेताजींच्या 'आझाद हिंद सेना' फौजेत दाखल झाले, त्यांचा पराक्रम आपल्याला स्फुरण देतो.
शहानवाज असाच एक लढवय्या वीर नेताजीच्या विचारांनी भारावलेला, ब्रिटिशांच्या जुलुमशाही राजवटीने व्यथित झालेला. तो नेताजीच्या सेनेत दाखल होऊन देशासाठी प्राणपणाने लढला, इंफाळच्या मोहिमेत कैद झाला आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यात अडकला.
हा शहानवाज एकेकाळी ब्रिटिश अधिकारी कॉलिन्स यांचा लाडका विद्याथी होता. त्याला पुन्हा आपल्या फौजेत वळवता येते का, हे पाहण्यासाठी कॉलिन्स आपल्या ताफ्यासह त्याला भेटायला आले. आपला उबदार हात त्यांनी शहानवाजच्या पाठीवर ठेवला. साखळदंड
करकरले. शरीर थरथरले.. "शहानवाज, अजून विचार कर. तुझी उमर अवधी एकविशीची."
"का? फाशीसाठी हे वय अपात्र आहे?" "बेवकूफ बनू नकोस, तू तुझी करियर अजून बनवू शकतोस."
"तो कशी?" शहानवाजने विचारले. कॉलिन्स हळुवार त्याच्याजवळ आले. त्याला 'हिंदुस्थानच्या कमांडर इन चीफ' पदाचे आमिष दाखवले आणि त्या बदल्यात शहानवाजने 'माफीचा साक्षीदार व्हावे, असे सुचविले.
"माफीचा साक्षीदार' हे शब्द विषारी बाणासारखे त्याच्या काळजात घुसले. नेताजीची तेजस्वी मूर्ती डोळ्यांसमोर आली.कॉलिन्स येण्यापूर्वीच त्याच्या कंठातून सूर उमटले होते. "आझाद हिंदऽऽ शिदाबाद झिंदाबादऽऽ प्यारे नेताजी झिंदाबादऽऽ"
शहानवाजने तडपत्या त्वेषाने सांगितले, "सर, असे पुन्हा बोलू नका. मनुष्याच्या आयुष्यात अशी काही माणसे येतात; त्यांच्या पुसटशा सावल्या जरी अंगावर पडल्या तरी आयुष्याचे सोने होते. कमांडर होईनही. पुढे काय? एक दिवस मातीआडच ना? जन्मभर लाचारी आणि "जी हुजूर' करून मिळवलेली पदके माझ्या प्रेताकडे बघत डोळे मिचकावत हसतील. पण नेताजीचा शिपाई केवढा मोठा हा सन्मानाचा तुरा।' माझ्या यापुढे जन्मणान्या छप्पन्न पिढ्या हा मान छातीवर मिरवत नाचतील. ज्याला त्याला सांगतील. आमचा बाप नेताजीचा प्राणप्रिय सहकारी होता! सर, नेताजींच्या परिसस्पशनि मला जिवंतपणी अमरत्व प्राप्त झाले. त्या सन्मानापुढे तुमच्या त्या दौडदमडांच्या बढतीची काय पर्वा!"
त्याने खडसावून कॉलिन्सला सुनावले, "सर, तुमचा इंग्लंड असेल महान नाटककारांचा देश, पण आमची भूमी
असामान्य नटांची-नायकांची दारिद्रयाच्या अज्ञानाच्या नि अंध:काराच्या गाळात रूतलेल्या कोट्यवधी जनतेला सन्मानाचा आणि सद्गतीचा रस्ता दाखविणारे महानायक हिंदुस्थानच्याच कुशीत जन्म घेऊ शकतात!"
शहानवाजला बढती देण्यासाठी आलेले ब्रिगेडियर कॉलिन्स स्तब्ध झाले. आपल्या ताफ्यासह ताडताड निघून गेले. आपल्या देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता व्हावी म्हणून विविध
जातिधर्माचे अधिकारी नेताजीच्या नेतृत्वाखाली लढले. त्यांनी शेतीवाडी,घरसंसाराकडे पाठ फिरवून स्वदेशासाठी प्राणांची बाजी लावली,
चार वेळा फाशी दिली तरीही त्यांनी मान सोडली नाही अशे महान स्वतंत्र सेनानी तात्या टोपे यांचा इतिहास
शहानवाज यांच्याबरोबरच धिल्लन, सेहेगल यांनाही लाल किल्ल्यात डांबले होते. त्यांच्यावर खटलाही भरला गेला होता. परंतु जनतेच्या जबरदस्त प्रेमापुढे ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. तिघांची मुक्तता झाली.
नियतीचा महिमा किती अगाध असतो पाहा! ब्रिटिश राजवटीतील 'बढती
नाकारणारे हेच शहानवाज खान भारताच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले.
नेताजीच्या परिसस्पर्शाने जीवनाचे सोने तर झालेच पण नेताजींचा प्राणप्रिय सहकारी' म्हणून पुढच्या पिढ्यान् पिढ्यांनी अभिमानाने मिरवावा असा कायमचा किताब त्यांच्या जीवनग्रंथात नोंदला गेला.
\संदर्भ -चैतन्याचे चांदणे