साने गुरुजी
वेळ रात्रीची तारीख ३० मार्च १९३० एक शिक्षक शाळेच्या आवारात अस्वस्थ मनाने हिंडत होते. महात्मा गांधीजींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह करण्याचा निर्धार केला होता. या शिक्षकाचे मन झपाटले होते ते स्वातंत्र्यलढा सहभागी होण्याच्या भावनेने! पण एका बाजूला त्यांना विद्यार्थ्यांचे प्रेम खेचत होते, तर दुसऱ्या बाजूला भारतमातेचे प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. काय करावे? शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या पायरीवर ओंजळभर फुले ठेवून त्यांनी हात जोडले, लाडक्या विद्यार्थ्यासाठी लाल शाईने छात्रालय दैनिकाचा अंक झराइरा लिहून काढला, अंक फुलाशेजारी ठेवताना त्यांचा कंठ दाटून आला. रात्रीच्या अंधारातच सद्गदित अंत:करणाने, त्यांनी अमळनेरच्या हायस्कूलचा निरोप घेतला आणि समाजाला जागे करण्यासाठी ते बिनभितीच्या उघड्या शाळेत आले. मुलांच्या रंजनासाठी त्यांनी गोडगोड गोष्टी सांगितल्या छान छान कविता केल्या. देशभक्तीपर गीते रचली नि देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसतास भोगला. विठ्ठल मंदिरातील हरिजनांच्या प्रवेशासाठी प्राण पणाला लावले मानवतेच्या उद्धारासाठी सारे आयुष्य फुलासारखे उघळून दिले. अशा संवेदनशील मनाने व सौजन्यशील वृत्तीने जीवन जगणाऱ्या या सेवाभावी महान शिक्षकाचे नाव 'साने गुरुजी!' सौपा हिस्सा खोताला मिळत असे. त्यामुळे त्या काळी खोताचे घराणे वैभवशाली व श्रीमंत समजले जाई. गरीब शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून मिळवलेली ही श्रीमंती गुरुजीच्या बालमनाला कधी रुचली नाही. आपल्या आईच्या अंगावरच्या दागदागिन्यांच्या वर्णनाने त्यांचे मन कधी मोहरून गेले नाही. पाणीदार मोत्यांच्या • नयींच्या ठिकाणी त्यांना गरीब स्त्रीच्या डोळ्यांतील अश्रू दिसायचे नि डोळे पाण्याने डबडबायचे. अर्थात हे लबाडीचे वैभव गुरुजींच्या वाट्याला आले नाही. एक मोठा दरोडा पडला, सारे घरदार लुटले गेले. आर्थिक परिस्थिती ढासळली. घरदार जप्त झाले. गुरुजींचे वडील कर्जबाजारी झाले. अशा घराण्यात संगतीला दारिद्र्य घेऊन गुरुजी वाढले.
गुरुजींनी विद्यार्थीदशेत माधुकरीवर, तर कधी शिळ्यापाक्या तुकडयवर, गिरणी मालकाकडून मिळणाऱ्या पिठावर, तर कधी नुसत्या काकडीवर दिवस रेटले. चिकाटीने एम.ए.चे शिखर गाठले. या सर्व वाटचालीत जमेची बाजू एवढीच, की धैर्याने संसार सावरून धरणारी थोर मनाची यशोदा माऊली त्यांना लाभली होती. घरची गरिबी असली तरी ही माऊली संस्काराने श्रीमंत होती. ही श्रीमंती तिने आपल्या लेकरांना बहाल केली. ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवून मानध्याची पूजा केली. संकटकाळात ती कधी खचली नाही. नको ते हट्ट धरून कधी रुसली नाही. आपल्याजवळ असेल ते दुसऱ्याला द्यावे, त्याचे अश्रू दांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे, असे साधेसोपे तत्त्वज्ञान स्वीकारून तो स्वाभिमानाने जगली.
आपल्या आईच्या आठवणींना गुरुजींनी 'श्यामची आई' ग्रंथाचे कोंदण दिले. मातेच्या वात्सल्याची महती मराठी मनावर बिक्वणारा हा ग्रंथ नाशिकच्या तुरुंगात जन्माला आला. भारतमातेच्या मुक्तीसाठी शिक्षा भोगताना गुरुजी दिवसा काम करायचे नि रात्री राजबंदिवानासमोर जन्मदात्रीच्या भावस्मृतीत रंगून जायचे. अवघ्या पाच दिवसांत मातृप्रेमाचे हे अक्षरलेणे आकाराला आले. मायलेकरांच्या भावोत्कट प्रेमाचा एक मंगलकलशच गुरुजीनी आपल्या हाती दिला आहे.. लेकरांना आपल्या हृदयाशी घेऊन चैतन्याचा मधुर पान्हा देणारी ही गुरुजींची माऊली आता अवघ्या महाराष्ट्राची माऊली झाली आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणे 'श्यामची आई'ची पारायणे ज्ञानमंदिरात संपन्न होताहेत.
Read also
रामकृष्ण परमहंस | गुरू शिष्याची एक अनोखी गोष्ट
स्वच्छ शरीर व निर्मळ मन हीच खरी धनदौलत मानणारे गुरुजी मनाच्या पावित्र्यासाठी रोज प्रार्थना म्हणायचे, नि शरीराच्या स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा स्नान करायचे. एकदा लहानपणी सायंकाळी स्नान केल्यावर आईने मुलाला देवासाठी फुले काढायला सांगितली. हा प्रसंग गुरुजींनी 'श्यामची आई मध्ये मांडला आहे. त्यातला श्याम म्हणतो, "आई, तळवे ओले आहेत, त्याला माती लागेल. तुझे ओचे थोडीवर पसर, त्यावर पाय टिपून घेतो.. "बिचाया माऊलीने पायाला माती लागू नये म्हणून आपला पदर त्याच्या पायाखाली घसरला. श्यामने फुले काढून आणली. मग निरंजनाच्या शांत प्रकाशात त्या माऊलीने भूतलावरच्या समस्त लेकरांना संदेश दिला, "श्याम पायाला पाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये, म्हणून जप हो, देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून." आईचा हा उद्गार आपली गात्रे प्रफुल्लित करतो, यासाठी मातृप्रेमाचे हे महामंगल स्तोत्र सर्वांनी वाचले पाहिजे.
'बापूजीच्या गोडगोड गोष्टी लिहून गुरुजींनी आपल्या गांधीनिष्ठेचे सुंदर दर्शन घडविले आहे. विनोबाजीच्या गीताप्रवचनांना अक्षरबद्ध करून त्यांनी भावभक्तीचे सात्त्विक प्रत्यंतर दिले आहे. गुरुजींच्या वाणीत मंत्राचे मांगल्य आणि लेखणीत संस्काराचे सामर्थ्य आहे. येरवड्याच्या तुरुंगातून त्यांनी बालवीरांना प्रेरणा देण्यासाठी लिहिलेली 'गोप्याची कहाणी' असो वा मुलांचे मानसशास्त्र समजावून घेण्यासाठी लिहिलेली 'सुंदर पड़े असे, माणूस आणि संस्कृती हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता, तर मुलं हा त्यांच्या जिव्हाळ्याचा अविभाज्य भाग होता.
परीक्षा हा प्रकार गुरुजना रानटी वाटायचा, हा मुलांचा कोंडमारा कधी थांबेल, असे ते काकुळतीने विचारायचे. नि म्हणायचे, आईबाप परीक्षेचा बाऊ करतात. गंभीर बातावरण करतात. मूल नापास झाले, तर आईबापाने म्हणावे, 'नापास तर नापास, पुढील वर्षी पास हो ये आपण खेळू परीक्षा म्हणजे काय आयुष्य... जीवन ही निराळी वस्तू आहे. अरे, परीक्षा कृत्रिम असतात. जिथे पद्धतीच सदोष तिथे तुझा काय दोष? ये वाईट नको वाटून घेऊ... हस बघू.' किती अवघड भूमिका गुरुजी पालकांना घ्यायला लावतात. गुरुजींची भूमिका क्षमाशील वत्सल मातेची आहे.
ही भूमिका वठविण्यासाठी आपणास गुरुजींची 'सुंदर पत्रे घरी आणली पाहिजेत. आपल्या संस्कृतीचे मोठेपण समजवण्यासाठी त्यांच्या 'भारतीय संस्कृती मधील ज्ञान, भक्ती, कर्म नि संयमाचे धडे गिरविले पाहिजेत. समाजाला काळानुरूप नवा विचार देणारा विद्वान जितका थोर, तितकाच समाजाला धान्य देणारा शेतकरी थोर, शाळेतील शिक्षक जितका थोर, तितकाच रस्ता झाडणारा झाडूवाला थोर बुद्धिजीवी आणि श्रमजीवी यांच्या नात्यातून व्यक्तिविकास व राष्ट्रविकास होत असतो, हे गुरुजीचे जीवनसूत्र होते. 'मी समाजासाठी, समाज माझ्यासाठी हा त्यांचा जीवनमंत्र होता. 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ही त्यांची जीवनदृष्टी होती, तर 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनि राहो' हो त्यांची जीवनाकांक्षा होती.
रवींद्रनाथांच्या विश्वभारतीच्या धर्तीवर आंतरभारतीचे स्वप्न गुरुजींनी पाहिले. प्रांताप्रांतांतील भाषापरंपरा या परस्परांनी आत्मसात करून बंधुप्रेमाचे सुंदर मंदिर उभारावे, हे आंतरभारतीचे स्वप्न होते. पण आपले स्वप्न साकार होईल, असा विश्वास गुरुजींना वाटेना, स्वातंत्र्याचा सूर्य उगविल्यानंतरही आपण विषमतेचा, दुःख दारिद्र्याचा अंधार दूर करू शकत नाही, या निराशेने त्यांना ग्रासले. नि एका उद्विग्न अवस्थेत गुरुजींनी आपल्या हातानेच आपली जीवनज्योत मालवून टाकली. समाजमन काळवंडलेले असतानाच हा संस्कारदीप विझला, त्याग, सेवा, प्रेम, शांती, कारुण्य या अक्षरांना न्याय देणारा हा संस्कारदीप आजही आपल्या साहित्याद्वारे तुमच्या-माझ्या पावलांना प्रकाशाचा पथ दाखवतो आहे. आजचे नि उद्याचे जगणे चैतन्यदायी करण्यासाठी प्रत्येकाने हा संस्कारदीप मनाच्या गाभाऱ्यात सदैव तेवत ठेवला पाहिजे. ती काळाची गरज आहे.
आपल्या साहित्यातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन संपन्न करणारा हा साने गुरुजी नामक संस्कारदीप २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० या कालावधीत शांतपणे तेवत राहिला. ज्ञानसंस्कृतीच्या प्रकाशाने दशदिशा राहिला.
कोकणातील दापोलीजवळ पालगड हे गुरुजींचे गाव. पांडुरंग हे त्यांचे जन्मनाव, त्यांचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत. खोत म्हणजे आलेला शेतसारा वसूल करून तो सरकारात जमा करणारा बिनपगारी लाल यांचा