महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. प्रार्थनासमाज आणि ब्राह्मोसमाजाच्या धर्मपरिवर्तनवादी विचारांचे खंदे प्रचारक होते. जातिधर्माच्या कर्मठ परंपरेमुळे माणसाच्या वाट्याला आलेली अस्पृश्यता हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. महषींचे चिंतन डोळस व मर्मग्राही होते. दुर्दैवी दलित बांधवांच्या दुःखाने व्याकुळ होणाऱ्या महर्षींनी "निराश्रित साहाकारी मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या वतीने शाळा, वसतिगृहे, औद्योगिक शिक्षण केंद्र चालवून अस्पृश्यता निवारण्यासाठी अथक प्रयत्न केले. १९१७ मध्ये कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच 'अस्पृश्यता निवारणाचा' ठराव प्रथम आणला होता. तो मंजूरही झाला होता. त्यांनी 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यांनी वर्णव्यवस्था व जातिधर्माचे सखोल संशोधन केले. मराठी भाषेची उत्पत्ती आणि विकास या संदर्भातही त्यांनी संशोधनात्मक लेखन केले. तौलनिक धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांना ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये अभ्यास करण्याची संधी लाभली.
विद्यार्थीदशेत असताना विठ्ठल रामजीच्या जीवनात एक पेचप्रसंग उभा राहिला होता. त्यावेळी त्यांना 'भाऊबीजेची भेट लाभली नसती, तर काय झाले असते? परदेशगमन राहू द्या, पण पदवीधर होता आले असते का? अर्थात त्यांची जिद्द, चिकाटी दांडगी होती, पण एखादी घटना आयुष्याला विलक्षण वळण देते, हे मात्र सत्य
read also
भूगोल ही परमेश्वराची देणगी असेल, तर इतिहास हे मानवाचे मनगट आहे'.| सुभाषचंद्र बोस
एका वारकरी कुटुंबात जन्माला आलेल्या विठ्ठल रामजींनी स्वप्रयत्नातून कर्तृत्वाची गुढी उभी केली. कर्नाटक राज्यातील जमखंडी हे त्यांचे गाव. वढील रामजीबाबा विठ्ठलाचे उपासक, विठ्ठल रामजी मैट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गावातल्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. दोन-तीन महिन्यानंतर जमखंडीच्या श्रीमंत सरकारांनी विठ्ठल रामजींना बोलावून घेतले आणि मुंबईच्या •व्हेटरनरी कॉलेजमध्ये डॉक्टर होण्यासाठी जायला सांगितले, कॉलेजच्या खर्चाची बाबदारी श्रीमंतांनीच उचलायची ठरविले होते, पण "मला जनावरांचा डॉक्टर नाही. आपण मदत करलो तर, आर्ट्स कलिजात जायला मी तयार आहे." असे विठ्ठल रामजीनी बाणेदारपणे सांगितले. गावातल्या सरकारांना विरोधा काय, मदत तर बाजूलाच राहिलो, पण विठ्ठल रामजीना शिक्षकपदावरूनही कमी करण्यात आले. परिस्थिती अगोदरच बेताची. त्यात हा फटका. पण ते डगमगले नाहीत.
विठ्ठल रामजींची आईसुद्धा जिद्दी होती. तोच वारसा लेकराला लाभलेला. त्यांनी पुढील शिक्षणासाठी पुण्यात जायचे ठरविले. गंगाराम भाऊ म्हस्के या दानशूर गृहस्थांनी विठ्ठल रामजीना दरमहा दहा रुपयांची शिष्यवृत्ती दिली. खोलीभाडे व खानावळ यातच ते खर्च व्हायचे. कॉलेज फीमध्ये सवलत देण्यास प्राचार्यांनी नकार दिला. काय करणार, गरजा आणखी कमी केल्या. गावाकडे सुट्टीला जाताना ते कुडचीपासून जमखंडीपर्यंत ३३ मैलांचा प्रवास सामानासकट पाय करायचे नि बैलगाडीचे चार-आठ आणे भाडे वाचवायचे, तेवढीच बचत, एग एक आर्थिक पेचप्रसंग उभा राहिला. परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. फी होती २० रुपये आणायचे कोठून? मागायचे कोणाला? घरी तर दारिद्र्या विश्वविद्यालयाच्या प्रिव्हियस परीक्षेचा फॉर्म भरला नाही तर वर्ष वाया जाणार आपल्या पाठच्या भावंडासमोर आपण काय आदर्श ठेवणार? गावचे सरकार टर उडविणार मोठा कठीण प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता.
just read it
"दगडी शाळा" आणि जिद्दीचे बाळकडू गुरुवर्य देवघर |सीताराम गणेश देवधर
विठ्ठल रामजी गांगरले होते. एका सद्गृहस्थाने त्यांना रावबहादूर नवलकरांचे नाव सुचवले. ते मदत करतील असे सांगितले. आशा बेडी असते. नवलकरांनी दोन रुपये दिले. सोबत 'याला मदत करावी' या आशयाची एक चिठ्ठी स्वतःच्या काही मित्रांसाठी दिली. दुसऱ्याच्या दारात जाऊन आपल्या गरिबीचे प्रदर्शन करणे, विठ्ठल रामजीना संकोचल्यासारखे वाटू लागले, पण दुसरा काही पर्याय नव्हता. त्या वेळच्या मानाने फीची रक्कम मोठी होती. अन् अवधी थोडा होता. ग. महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण भांडारकर, सरदार मुदलियार अशा मंडळींनी दिलेल्या मदतीतून १४ रुपये जमले. बाकीच्या रकमेचे भलेमोठे चन्हसमोर होतेच. त्यातच कुणीतरी डॉ. शेळके यांचे नाव सुचविले. मराठा समाजातले एक धनदांडगे गृहस्य म्हणून त्यांची ख्याती होती. ते आपल्याला आधार देतील असे वाटून, विठ्ठल रामजीनी नवलकरांची चिठ्ठी डॉ. शेळकेंपुढे देवली... नि... डॉक्टर साहेबांचा एकदम पाराच चढला.
"मराठ्यांच्या कुळात जन्मून हे भिक्षापात्र मिरविण्याची तुला लाज वाटत नाही? जवळ पैसा नसल्यास गुरे राखावीत, कशास शिकावे?"
ती चिठ्ठीच नव्हे तर जवळचे १४ रुपये ह्या जमदग्नीपुढे ठेवावेत अन् पळून जावे, असे विठ्ठल रामजींना वाटले, अंगाला घाम आला. धनाने श्रीमंत माणसे मनाने श्रीमंत असतात असे नाही, याचा दाहक अनुभव आला.
परमेश्वर काही वेळा माणसाची सत्त्वपरीक्षा पाहतो, पण तोच उत्तरही सुचवितो. तेरदाळचे एक मित्र विष्णुपंत देशपांडे यांना विठ्ठल रामजीची अडचण लक्षात आली. विष्णुपंतांच्या पत्नी बहिणाबाई ह्या विठ्ठल रामजीना आपल्या नवऱ्याचा मोठा भाऊ समजत असत. त्यांच्या मनात विठ्ठल रामजीबद्दल आस्था होती. ते कोणत्या परिस्थितीत शिकताहेत, याची जाणीव होती. त्यांनी आपल्या माहेराकडून दिवाळीतील भाऊबीजेच्या ओवाळणीत मिळालेले २० रुपये विष्णुपंतांकरवी विठ्ठल रामजीकडे धाडले. पेचप्रसंगातून सुटका झाली. ते परीक्षा उत्तीर्ण झाले.
आयुष्य पुढे सरकत होते. परोपकारासाठी लाखो रुपये जमविण्याची पात्रता महर्षी विठ्ठल रामजीकडे आली. समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती झाली, पण आयुष्याच्या विचित्र वळणावर उदार मायेने आपली भाऊबीज भेट देणाऱ्या बहिणाबाईच्या प्रेमाची अक्षरनोद महर्षीनी माझ्या आठवणी व अनुभव या आपल्या ग्रंथात केली आहे.
मन मरगळून जावे असे कित्येक क्षण माणसाच्या आयुष्यात येतात. माणूस. चकून जातो. निराश होतो. काळजीचे ढंग डोक्यावर थैमान घालतात पण अशा वेळीच एखाद्या बहिणाबाईच्या मायेची भेट आयुष्याच्या आकाशात चैतन्याचे चांदणे निर्माण करते. त्यातूनच जीवनाला उजाळा मिळतो.