राजा रविवर्मा
ईश्वराने कोकिळेला कंठ अन् मोराला पिसारा दिला, तसे माणसाला बुद्धी आणि कलेचे वरदान दिले. कला शिकवून येत नाही. ती उपजत असावी लागते. तिला प्रोत्साहन, मार्गदर्शन लाभावे लागते. मग आपल्या अलौकिक प्रतिभेतून तो कलावंत सुंदर कलाविद्याची निर्मिती करतो. आज राजा रविवर्मा आपल्यात नाहीत, पण त्यांच्या कुंचल्यातून साकार झालेला अनमोल चित्रांचा ठेवा मात्र त्यांची महती सांगतो आहे. आपल्यातल्या सुंदरतेचे शिपण करीत राजा रविवर्मानी कलाक्षेत्रावर चिरंतन चैतन्याची मुद्रा उमटवली आहे.
राजा रविवर्माांना प्रोत्साहन लाभले ते त्यांच्या मामांचे. राजा वर्मा हे रवींचे मामा तेही निष्णांत कलावंत होते. कुशल चित्रकार होते. रवी आपल्या आईवडिलांसमवेत मामांच्याच प्रशस्त वाड्यात राहायचा मामा शिस्तीबाबत कठोर तापट स्वभावाचे, पण मनाने कोमल, कलेबाबत उदार रवी मात्र भलताच अवखळ जागा सापडेल तेथे त्यांची चित्रकारिता सुरू व्हायची, मग तो कागद असो वा भितः
read also
महात्मा गांधीजींची खादी आणी दाढी | एक अनोखा प्रसंग
एकदा असे घडले. आपल्या बहिणीला-मंगलला संगती घेऊन रवीने आपला मोर्चा नेहमीप्रमाणे वाड्यातल्या चौकाकडे वळवला. चौकात छानसे देऊळ होते. नुकत्याच चुन्याच्या रंगाने रंगविलेले. पांढऱ्याशु भिती, या भितीच रवीला खुणवत होत्या. मग काय रवी हातात कोळसे घेऊन तिकडे झेपावला..
तसे नेहमीच तिथल्या भितीवर भराभर चित्र सादर व्हायची. विविध प्राण्यांचे प्रदर्शन भरायचे. प्रतिभेच्या स्पर्शातून प्रमाणबद्ध हत्ती, घोडे, मांजर, कुत्रे आकाराला यायचे. कोळशाच्या भुकटीने हात काळे व्हायचे अन् हाताच्या | हालचालीने नाकाचा शेंडा रंगायचा, गालावर कृष्णवर्ण उमटायचा. प्रदक्षिणा मार्ग मात्र खराब व्हायचा. हा त्याचा नित्यपाठच होता.
रवीचा हा सृजनसोहळा पाचनला मात्र आवडायचा नाही. पाचन हा राजावर्माचा म्हणजे रवींच्या मामांचा एकनिष्ठ सेवक त्यांच्या विशेष मर्जीतला. त्याला पुन्हा भिती, परिसर स्वच्छ करायला लागायचा. वैतागायचा तो! अनेक वेळा त्याने रवीला हटकले. हे पोर पक्के हट्टी! त्या दिवशी कहर झाला. हा 'वि-चित्र' प्रकार मामांच्या कानावर घालायचा ठरविले. तसा पाचनने त्याला दम दिला. अंतिम उपाय तोच होता.
"काय म्हणतील मामा?" रवीनेच उलट प्रश्न केला, 'काय म्हणतील?' असे पुन्हा म्हणत पाचन पाय आपटत राजा वर्माकडे गेला. सारी हकीकत रंगवून सांगितली. राजावर्माच्या पिगट डोळ्यांत क्रोधाच्या छटा उमटत होत्या. ते ताडकन उठले. पाचनने जाणले. 'आता पोराची काय धडगत नाही. याचेही त्याला कसेसेच वाटले. "पोरांना मारू नका म्हणून पाचनच विनवू लागला. राजावर्मा देवळापाशी आले. कोळसे इकडेतिकडे विखरून पडले होते. पोरं गायब झाली होती.
"स्वामी बघा! शिपत्याच्या चुन्याने रंगविलेल्या भितीची काय वाट
read also
गौतम बुद्धांनी सांगितलेला अश्रूंचा खरा अर्थ काय ?..
लागली पाचनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राजावर्मा शांतपणे देवळावर चितारलेले भांजर, कुत्रे, हत्ती, घोडा पाहत होते. सर्व जनावरांत घोडा हे चित्र महाकठीण, पण रवीने रेखाटलेला घोडा उमदा होता. प्रमाणबद्ध होता. नाहीतर काहीजण हौसेने प्राण्यांची चित्रे काढतात, पण त्याखाली त्यांना प्राण्यांची नावे पायला लागतात! राजावर्मा एकाप्रतेने भिंतीवरील चित्रे निरखीत होते. त्यांनी रवीच्या आईला बोलावणं धाडलं.
"मुलं असं काही करतील हे त्या माऊलीलाही वाटत नव्हतं. तो तसं गालीसुद्धा यावर राजावस कडाडले, "तुझी पुराणकथा, बापाचे वेद आणि माझी
चित्रकला यात वाढलेली मुलं दुसरं काय करणार? आपल्या भावाच्या बोलण्याने तो भयभीत झाली. त्यांच्या बोलण्याचा रोखव कळेना. मुलंही आजूबाजूला दिसेनात. ती मामाच्या भीतीने गाड्याबाहेरच्या देवाकडे पती होती. राजवर्मा त्या दिशेला वळते. तेथे जाऊन पाहतात, तर त्या भितीही सुटल्या नव्हत्या. रवीच्या रंगरेषांनी सजल्या होत्या.
"हे कोणी केलारी जाम हबकला. त्याला माहिती होता राजावर्माचा संताप पोरं तिथूनही गायब झालेली. राजवर्मानी रवीला मोठ्यांदा हाक दिली. शांततेचा भंग करीत, ती हाक आसमंतात घुमली. रवी-मंगल हादरली. दोपही दबकत दबकत मामांच्या समोर आली. मंगलला तर रडूच फुटलं, अन् रवीने चक्क मामांच्या पायावर लोटांगण घेतलं. मामांच्यातला कलावंत जागा झाला. राग मावळला, रवीला कवेत घेत चित्रांवर नजर टाकली, "ही चित्रे पुसू नका." हुकूम दिला. आल्या पावली ताडताड निघून गेले.
must read
शिवनेरी किल्ल्याचा शिवजन्मापूर्वीचा इतिहास | शिवनेरी किल्ला कोणत्या राजाने व का बांधला? | जाणून घ्या
दुसऱ्या दिवशी रवीला मामांकडून रंगशाळेत भेटण्याचं बोलावणं आलं. रबीच्या मनात नाना तरंग उठले. कशासाठी बोलाविले असेल? कौतुक होईल की शिक्षा? मामांची रंगशाळा. आजवर जिथं पाचनव्यतिरिक्त कोणाला प्रवेश नव्हता. तिथं आपल्याला पाऊल ठेवायला मिळाल्याने रवी हरखून गेला. रंगशाळेतील परळ, रंग, कुंचले बघून त्याचं मन उचंबळून आलं. एका बाजूला मामांच्या चित्रांची चवड होती. त्यातली काही चित्रे रवीच्या हातात देत मामा म्हणाले, "या चित्रांची मागची बाजू कोरी आहे. हे रंग थे, मी तुला रंग कसे करायचे ते शिकवीन."
रवी आपल्या मामांकडे पाहतच राहिला. पाठीवर प्रोत्साहनाचा हात पडला. जीवनातच नवा रंग भरला. त्याच्या मनात चैतन्याच्या लहरी उसळल्या. कलेच्या प्रांतात विहार करायला निघालेल्या पाखराला पंख गवसले. अंतःकरणाच्या अवकाशात आनंदाचे इंद्रधनु उमटले. अपार कलानिष्ठा, अथक परिश्रम आणि प्रगल्भ प्रतिभा या जोरावर या पाखराने झेप घेतली. राजा रविवर्मा आंतरराष्ट्रीय कोतींचे चित्रकार झाले. त्यांच्या चित्रशैलीने भारतीयांची मान उंचावली.