गुरुपरीक्षा आणि गुरुभक्ती
रामकृष्ण परमहंस
अक्षरांचा गंध नसलेले, पण उच्चारलेल्या शब्दांना शहाणपणाचा सुगंध असलेले श्री रामकृष्ण परमहंस हे भारतीय संस्कृतीचे उपासक आणि जीवनाचे भाष्यकार होते. कामिनी आणि कांचन या मोहांवर विजय मिळवला, की आत्मज्ञानाला आरंभ होतो, आंतरिक तळमळीने केलेली भक्ती होच खरी ईश्वरपूजाच असते, हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. मानवधर्माची महती जाणणारे विश्वमानव विवेकानंद हे रामकृष्णांचे शिष्य शिष्यांनी गुरूंची परीक्षा पाहिल्याचे काही गमतीदार प्रसंग रामकृष्ण चरित्रात दिसतात.
योगेंद्र हा रामकृष्णांचा एक विशीतला तरुण शिष्य. सळसळत्या उत्साहाचे वय असल्याने तो रामकृष्णांच्या शारीरवासनामुक्त जीवनाविषयी सदैव साशंक असायचा. रामकृष्ण तर आपल्या पत्नीकडे जगन्मातेच्या दृष्टीने पाहत होते. त्यांनी सारदादेवींची कालीभावनेने पूजाही केली होती. ऐन तरुण वयातही रामकृष्ण व सारदादेवी एकत्र राहत असूनही शारीरवासनेचा भाग त्यांच्या जीवनात कोठेच उद्भवला नाही. हे सारे सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडचे आहे. रामकृष्णांच्या ह्या संयमी व सात्विक जीवनाबद्दल हा योगेंद्र मात्र संशयी एक दिवस तो रामकृष्णांच्या खोलीतच झोपण्यासाठी थांबला. सारदादेवी नौबतखान्यातील खोलीत झोपत असत.
Must read
महात्मा गांधीजींची खादी आणी दाढी | एक अनोखा प्रसंग |
मध्यरात्रीच्या सुमारास रामकृष्ण उठले. त्यांनी योगेंद्रकडे पाहिले. त्याला झोप लागली असावी या भावनेने ते एकटेच पंचवटीच्या बाजूला झाऊतलाकडे गेले. रामकृष्ण बिछान्यावर नाहीत, हे पाहिल्यावर योगेंद्र ताडकन उठला. बाहेर पडवीत आला. एकटक नौबतखान्याच्या खोलीकडे पाहू लागला. संशय बळावला. मन भयकंपित होऊ लागले. तेवढ्यात प्रातः विधी आटपून रामकृष्ण झाकतलाकडून आले. योगेंद्रच्या पाठीवर हळुवार हात ठेवला. "काय रे! इथे उभा राहून काय करतो आहेस?"
योगेंद्र दचकला पुरता गोधळून गेला. शंकानिरसन झाले खरे पण मनाया गुरुविषयीच्या शंकेचे, पापी विचारांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटले. रामकृष्णांनी ते आणले. कोणताही जागा किंवा हेटाळणी न करता ते शांतपणे म्हणाले, "ठीक आहे. साधूला दिवसा पाहावं, रात्री पाहावं आणि मगच त्याच्यावर विद्यास ठेवावा."
योगेंद्र काय बोलणार बिचारा पुरता खजील झाला होता. रामकृष्ण शांतपणे झोपी गेले, पण याची झोप उडाली नि डोळेही चांगलेच उपडले. हा झाला कामिनीमोहावरचा प्रसंग दुसरा प्रसंग आहे रामकृष्णांच्या
निष्कांचनवृतीचा, नरेंद्रने विवेकानंद नाव धारण करण्यापूर्वीचा हा प्रसंग आहे. एक दिवस रामकृष्ण बाहेर गेले असताना नरेंद्रने त्यांच्या खोलीत प्रवेश केला आणि त्यांच्या अंथरूणाखाली एक रुपया हळूच ठेवून दिला. साधूला पैशाचा मोह नसतो, हे गुरूंचे तत्त्वज्ञान जणू नरेंद्रला फोल ठरवायचे होते. त्याने त्यासाठी गुरूलाच परीक्षार्थी विद्यार्थी केले. काही वेळाने रामकृष्ण आपल्या खोलीत आले. नरेंद्र बाजूला लपून राहून निरीक्षण करू लागला. रामकृष्ण या रुपया ठेवलेल्या मंचकावर बसले नि त्यांच्या सर्वांगाला बेदना होऊ लागल्या. त्यांच्यासमवेत असणाऱ्या दुसऱ्या शिष्याला या वेदनांचा 'अर्थबोध' होईना. शेवटी त्याने रामकृष्णांचे पांघरूण जोरात झटकले आणि रुपया बाहेर पडला. रामकृष्ण शांत झाले. नरेंद्र काही न बोलता तेथून सटकला. गुरूंच्या निष्कांचनवृत्तीची खात्री पटली, मनोमन नतमस्तक झाला. आपली परीक्षा आपल्या शिष्यानेच पाहिली याचे रामकृष्णांनाही समाधान वाटले.
गुरुपरीक्षा पाहणारा नरेंद्र गुरुभक्तीबाबतही अग्रेसर होता. जेव्हा रामकृष्णांचा पशाचा आजार विकोपाला गेला, कर्करोग असल्याचे निदान झाले. तेव्हा नरेंद्र कमालीचा अस्वस्थ झाला, जगन्मातेला सांगून रामकृष्णांनी आपला रोग बरा करावा, म्हणून गुरूलाच गळ घालू लागला. रामकृष्णांचे उत्तर एकच, "तो जगन्माता आहे, या सान्या शिष्यांच्या मुखाने तूच तर खातो आहेस."
गुरुदेवांचा आजार बळावत होता. आपल्या जीवनात आता पोकळी निर्माण होणार या भावनेने शिष्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. प्रत्येक शिष्य आपापल्या जगण्याचा प्रयत्न करीत होता.
गुरुदेवांचा हा आजार संसर्गजन्य असल्याच्या भीतीने काही शिष्य गुरुसेवेस कचरत होते. नरेंद्रला ही बाब खटकली. शिष्यांच्या मनातले सारे भय म्हणजे गैरसमजूत होती. एका विलक्षण कृतीने हे सारे भय व गैरसमजूत नरेंद्राने दूर केली. त्याने केले एवढेच, रामकृष्णांच्या घशातील कर्करोगाची जखम धुऊन डॉक्टरांनी जे रक्तमिश्रित पाणी काचेच्या पेल्यात ठेवले होते, ते त्याने सर्वांसमोर शांतपणे पिऊन टाकले. सारेजण चकित झाले.
Read also
स्वतःवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्यासाठी कमी जगतो. ज्याला जगण्याचा आणि मरण्याचा अर्थ समजला तोच खरा महापुरुष. नरेंद्राने हा अर्थ जाणला होता. अलौकिक गुरुभक्तीतून त्याने तो सिद्धही केला. शिष्यांसमोर गुरुसेवेचा एक आदर्श उभा केला. सारेच शिष्य मोहरून गेले. त्यांच्या अंगी चैतन्य संचारले. 'नरेंद्र तुम्हाला शिकवेल' असे उद्गार रामकृष्णांच्या मुखातून बाहेर पडले. गुरुदेवांनी डोळे मिटले. 'धन्य ते गुरू, नि धन्य ती गुरुभक्ती!'
रामकृष्ण आणि विवेकानंद या गुरुशिष्यांची कीर्ती परस्परावलंबी आहे. विवेकानंदांमुळे रामकृष्ण साज्या जगाला समजले आणि रामकृष्णांमुळेच विवेकानंद पडले. जगाला माहीत झाले. विवेकानंद झाले नसते तर रामकृष्ण कदाचित कलकत्ता दक्षिणेश्वरपुरते मर्यादित राहिले असते. शिष्याच्या अलौकिक कार्यामुळेच गुरूच्या विलोभनीय व्यक्तिमत्त्वाची महती संपूर्ण विश्वाला कळली. पण रामकृष्णांचे श्रेष्ठत्व हे केवळ विवेकानंदांचे गुरुपद भूषविण्यापुरते मर्यादित नव्हते. शेवटी एक गोष्ट सत्य आहे. गुरूच्या शिकवणीतच शिष्याची उत्कर्षाची बीजे लपलेली असतात. त्यामुळे ज्याची गुरुभक्ती थोर, त्याची शक्तीही थोर!